शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या टप्यातील निवडणुकीवर ओमायक्रॉन संसर्गाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2022 05:00 IST

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची स्थगित झालेल्या निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सोमवार हा नामांकन दाखल करण्याचा अंतिम दिवस आहे, तर १० जानेवारी रोजी उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात येईल. त्यानंतर खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात होणार आहे. परंतु पहिल्या टप्प्यात झालेल्या निवडुकीपेक्षा दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक ओमायक्रॉनच्या सावटात होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा :  ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने स्थगित झालेल्या जागांवरील निवडणुकीवर आता ओमायक्रॉन व्हेरिएंटचे सावट आहे. जिल्हा परिषदेच्या १३ व पंचायत समितीच्या २५ जागांसाठी ही निवडणूक १८ जानेवारी होत आहे. मात्र,  प्रशासनाने जारी केलेल्या निर्बंधाने उमेदवारांपुढे प्रचाराचे दिव्य आहे. सार्वजनिक कार्यक्रमावर उपस्थितीच्या मर्यादेचे बंधन आणल्याने सभा घेणेही कठीण होणार आहे.जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची स्थगित झालेल्या निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सोमवार हा नामांकन दाखल करण्याचा अंतिम दिवस आहे, तर १० जानेवारी रोजी उमेदवारांना चिन्हांचे वाटप करण्यात येईल. त्यानंतर खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात होणार आहे. परंतु पहिल्या टप्प्यात झालेल्या निवडुकीपेक्षा दुसऱ्या टप्प्यातील निवडणूकओमायक्रॉनच्या सावटात होत आहे.भंडारा जिल्ह्यात कोरोना संसर्ग नियंत्रणात असला तरी राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी ३१ डिसेंबर रोजी आदेश जारी करून निर्बंध आणले आहेत. त्यात राजकीय कार्यक्रम बंधिस्त असो, की मोकळ्या जागेत, केवळ ५० व्यक्तींच्या उपस्थितीतच घ्यावे लागणार आहे. त्यासाठी प्रशासनाची पूर्व परवानगी घेणेही आवश्यक आहे. तसेच प्रचार करताना कार्यकर्त्यांना कोरोना नियमांचे पालन करणेही आवश्यक आहे. अशा स्थितीत प्रचार कसा करावा, असा प्रश्न उमेदारांपुढे राहणार आहे. ओमायक्रॉनच्या संकटामुळे राज्यस्तरीय नेत्यांच्या सभाही घेता येणार नाही. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत अनेक सभा घेण्यात आल्या होत्या. परंतु आता स्थानिक पातळीवरच सभा घेण्यापेक्षा बैठका घेण्यावरच भर द्यावा लागणार आहे.

मतमोजणीच्या ठिकाणी गर्दी रोखण्याचे आव्हान- जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या दोन्ही टप्यातील निवडणुकीची एकत्रित मतमोजणी १९ जानेवारी रोजी होणार आहे. जिल्हा परिषदेच्या ५२ आणि पंचायत समितीच्या १०४ जागांची मतमोजणी संबंधित तालुकास्थळी होणार आहे. ओमायक्रॉनचे सावट असल्याने प्रशासनाला मोठे दिव्य पार पाडावे लागणार आहे. यासोबतच मतमोजणीच्या ठिकाणी निकाल ऐकण्यासाठी होणारी गर्दी कशी टाळावी हाही मोठा प्रश्न राहणार आहे. कारण प्रत्येक उमेदवार आपल्या कार्यकर्त्यांना घेवून मतमोजणीच्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. त्यानंतर निघणाऱ्या विजय मिरवणुकीतही गर्दी होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत प्रशासन विजय मिरवणुकीला परवानगी देणार की नाही ही शंकाही अनेकांना सतावत आहे.

 

टॅग्स :ElectionनिवडणूकOmicron Variantओमायक्रॉन