शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

मुदतबाह्य पोषण आहाराचा पुरवठा

By admin | Updated: January 11, 2016 00:26 IST

अड्याळ येथील एका बचत गटातर्फे येथील अंगणवाड्यांना पोषण आहाराचे बंद पॉकीट वाटप करण्यात आले.

अड्याळ येथील प्रकार : अधिकारी तुपाशी लेकरू उपाशीविशाल रणदिवे अड्याळअड्याळ येथील एका बचत गटातर्फे येथील अंगणवाड्यांना पोषण आहाराचे बंद पॉकीट वाटप करण्यात आले. मात्र सदर आहार मुदतबाह्य असल्याचे दिसुन आल्याने खळबळ उडाली आहे. उपयोगाची अंतिम कालावधी उत्पादन केल्याच्या तारखेपासून तीन महिनेपर्यंत स्पष्ट लिहिले असल्याचा मुद्दा जागरूक पालकांनी उचलला आहे. विशेष बाब म्हणजे पॅकींग सुद्धा हाताने करण्यात आली आहे. एकात्मिक बालविकास योजना त्यात ० ते ६ महिने, ६ ते ३ वर्षे व ३ वर्षे ते ६ वर्षे वयोगटातील बालकांना तसेच गर्भवती व स्तनदा मातांना सुद्धा पुरक पोषण आहार, बचत गट द्वारा एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत दिला जातो. त्याचे उद्दिष्ट्य एकच असते. ते म्हणजे मुलांचा पोषण आहार विषयक व आरोग्य विषयक दर्जा सुधारणे. कुपोषण व शाळेतील गळती कमी करणे असे एक ना उद्दिष्ट्ये आहेत. ही चांगली बाब आहे. धान्य पुरवठा करणारे बचत गट यांचा आहार खरच पोषक असतो का? जर असेल तर मागील तीन वर्षात जेव्हा जेव्हा अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या मागणीनुसार त्यात ‘टीएचआर’ आहार बंद करून नवीन चांगला पौष्टीक आहार देण्याची मागणीे अंगणवाडीतर्फे नेहमी करण्यात येते.माहितीनुसार हा पुरक पोषण आहार पुरवठा केला जातो. याचा दर्जा चेहरे पाहून, कागदोपत्री केल्या जात असल्या कारणामुळेच आंगणवाडी सेविका व मदतनिस नेहमी टीएचआर आहार बंद करावी मागणी केली आत असणार का? अशी चर्चा सर्वत्र होत आहे. हा पुरक पोषण आहार का वाटप करण्यात आला म्हणून येथील अंगणवाडी सेविका व मदतनिसाला मोठे आधिकारी टार्गेट करीत असले तरी जेव्हा या आहाराची प्रयोगशाळेत चाचणी झाली. जेव्हा या धान्यांची पॅकींग करण्यात आली आणि या आहाराचा या अंगणवाड्यांना पुरवठा करण्यात आला तेव्हा अधिकाऱ्यांनी याची शहानिशा का केली नाही? असा सवाल ग्रामस्थांनी, ग्रामपंचयातीने केल्याची माहिती आहे. ज्या बचतगटाचे लेबल पॉकीटवर आहे ते २०१४ पासून परवानगी मिळालेली आहे. मग २०१३ चा शिक्का कसा? आजपावेतो पॅकींग मशीनची असायची, याच वेळी हाताने सिलाई का करण्यात आली, हेही एक न उलगडणारे कोडे आहे.ही माहिती जेव्हा पर्यवेक्षकांकडे यांच्यापर्यंत गेली, तेव्हा सर्व १० अंणगवाड्यांची तपासणी करण्यात आली. तेव्हा ‘प्रिंट मिस्टेक’ असल्याचे सांगण्यात आले. दिलेले पोषण आहार घरोघरी जाऊन भितीपोटी परत मागण्याचे काम सुरु आहे. बंद पॉकीटात असणाऱ्या आहारामुळे एखाद्या बालकाला किंवा मातेच्या आरोग्याला धोका उत्पन्न झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होतो. पवनी तालुक्यात हा आहार वाटप होत असल्याचे बचत गट अध्यक्षांनी सांगितले आहे. या प्रकाराची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. याकडे विशेषत: दोषींवर जिल्हाधिकारी कोणती कारवाई करतात त्याकडे अड्याळवासीयांचे लक्ष लागून आहे.