शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

माहितीचा अधिकार कार्यशाळेचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 22:32 IST

यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) पुणे यांच्या माध्यमातुन भंडारा जिल्हा पोलिसांकरिता माहितीचा अधिकार अधिनियम २००५ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन पोलिस सभागृहात करण्यात आले.

ठळक मुद्देयशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीचा पुढाकार

आॅनलाईन लोकमतभंडारा : यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) पुणे यांच्या माध्यमातुन भंडारा जिल्हा पोलिसांकरिता माहितीचा अधिकार अधिनियम २००५ या विषयावर कार्यशाळेचे आयोजन पोलिस सभागृहात करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून पोलीस अधिक्षक विनीता सााहू, अपर पोलीस अधिक्षक रश्मि नांदेडकर तसेच यशदा संस्था पुणे येथील समन्वयक वानखेडे, तसेच व्याख्याते प्रभुणे, अग्रवाल हे उपस्थित होते.यावेळी कार्यशाळेला पोलीस अधीक्षक विनीता साहू यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना महितीच्या अधिकाराविषयीचे संपुर्ण ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे. सदर कार्यशाळेमुळे सर्वांच्या ज्ञानात चांगली भर पडेल.त्यामुळे माहिती अधीकारांतर्गत विविध कालावधीत माहिती मागणाऱ्यास अपेक्षीत अचुक माहिती पाठविणे सोयीचे होईल. याबाबत माहिती दिली.यावेळी यशदा संस्था पुणे येथील व्याख्याते प्रभुणे यांनी आपल्या भाषणात माहितीचा अधिकार अनिनियम २००५ मधील आर.टी.अ‍ॅक्ट वापर माहिती अधिकार कायद्याचा इतिहास, स्वरुप, उद्दीष्टे व्याप्ती व कायदयातील महत्वाच्या संकल्पना समुचित शासन व सार्वजनिक प्राधिकरणाच्या जवाबदाऱ्या स्वयंप्रेरणेने प्रकटन करावयाची माहिती (१ ते १७ बाबी) तसेच (कलम ४०) स्वयंप्रेरणेने करावयाचे प्रकट नमुने जन माहिती अधिकारी पदनिर्देशन (कलम ०५) इ. विषयावर माहिती दिली.यावेळी यशदा संस्था पुणे येथील कोआॅर्डीनेटर अग्रवाल यांनी माहिती मागविण्यासाठी अर्ज करणे अर्ज निकाली काढण्याची प्रक्रिया (कलम ६ ते ७) माहिती प्रकट करण्याचे अपवाद (कलम ८ ते ९) अशंत: द्यावयाची व त्रयस्थ पक्षाची माहिती प्रकट करण्याची कार्यपध्दती (कलम १० ते ११), माहिती आयुक्त अधिकार, कार्य व कर्तव्य (कलम १२ ते १८), प्रथम व द्वितीय अपील त्यावर करावयाची व शास्ती (कलम १९ ते २०), माहिती वैयक्तिक माहिती, जनहित व त्रयस्थ पक्ष या संदर्भातील महत्वाचे न्यायनिवाडे, संकीर्ण कलम २१ ते ३१, जन माहिती यांनी करावयाचा पत्रव्यवहार व विविध प्रकारचे नमुने प्रथम अपिलीय प्राधिकारी यांनी करावयाचा पत्रव्यवहार व निकालपत्र याविषयावर माहिती देण्यात आली.सदर कार्यक्रमाला पोलीस उपअधिक्षक कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी जोगदंड, पोनी. सिडाम, पोनी. चव्हाण, ढोबळे, नेवारे, सपोनि कायंडे, राखीव पोलीस निरीक्षक वर्मा, पोलीस अधिकारी, कर्मचारी व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते. संचालन पोलीस उपअधिक्षक कुलकर्णी यांनी केले. आभार प्रदर्शन वानखेडे यांनी केले.