शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

संचालक मंडळाकडून रक्कम वसुलीचे आदेश

By admin | Updated: March 26, 2015 00:26 IST

भंडारा जिल्हा सेवानिवृत्त कर्मचारी सहकारी पतसंस्था मोहाडी येथील संचालक मंडळाने सन २००५-२००६ ते २०११ - २०१२ पर्यंत कर्ज वसुली आणि आवर्त ठेव रक्कम जमा करण्याकरिता ...

तुमसर : भंडारा जिल्हा सेवानिवृत्त कर्मचारी सहकारी पतसंस्था मोहाडी येथील संचालक मंडळाने सन २००५-२००६ ते २०११ - २०१२ पर्यंत कर्ज वसुली आणि आवर्त ठेव रक्कम जमा करण्याकरिता तीन टक्के कमिशनची २७ लाख १७ हजार ९९९ रुपयांची उचल केली होती. माजी सचिवांनी मानधनापोटी २ लाख ३६ हजार ५०० रुपये उचलले. संचालक मंडळ व सचिवाकडून एकूण २९ लाख ५४ हजार ४९९ रुपये वसूल पात्र ठरविण्याचे आदेश सहाय्यक निबंधकांनी दिले आहेत. भंडारा जिल्हा सेवानिवृत्त कर्मचारी सहकारी पतसंस्था मोहाडीचे सभासद वाय.एस. देशभ्रतार रा. तुमसर यांनी तीन वर्षापूर्वी विभागीय सहनिबंधक, नागपूर तथा सहाय्यक निबंधक, तुमसर यांचेकडे तक्रार केली होती. तक्रारीनुसार पतसंस्थेच्या संचालक मंडळाने सन २००५-२००६ ते २०११-२०१२ पर्यंत कर्ज वसुली आणि आर.डी. (आवर्त ठेव) रक्कम जमा करणे याकरिता ३ टक्के कमीशन उचल केली. ही कृती नियमबाह्य स्वरुपाची आणि सहकारी कायद्यातील व संस्थेच्या उपविधीतील तरतुदींशी विसंगत आहे. या अपकार्यामुळे पतसंस्थेचे आर्थिक नुकसान झाले आहे. या पतसंस्थेच्या माजी सचिवाने मानधनापोटी २ लाख ३६ हजार ५०० उचल केली होती. या प्रकरणाचे प्राधिकृत चौकशी अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक पी.डब्लू. भानारकर यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ८३ चौकशी प्रकरणास अधिन राहून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ८८ नुसार माजी सचिवाच्या स्थावर व अस्थावर मालमत्तेमधून २ लाख ३६ हजार ५०० रुपये तात्काळ वसुल करण्याचे आदेश दिले. कमिशनपोटी संचालक मंडळाने उचल केलेली रक्कम २७ लक्ष १७ हजार ९९९ रकमेसोबत जबाबदारी निश्चित करून वसुल पात्र ठरविण्यात आली. सहकारी पतसंस्थेचे दरवर्षी अंकेक्षण होते. तसा अहवाल विभागीय उपनिबंधकांना सादर करावा लागतो. हे प्रकरण सन २००५-२००६ ते २०११-२०१२ मधील आहे. येथे होणाऱ्या अंकेक्षण अहवालावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तालुका स्तरापासून विभागीय स्तरापर्यंत अधिकारी आहेत. काटेकोरपणे आणि नियमानुसार अंकेक्षण करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार पोहोचल्यानंतर प्रकरणातील सत्य उघडकीस आले आहे. (तालुका प्रतिनिधी)