शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

तत्कालीन सीईओ अहिरेंच्या काळातील कामांच्या चौकशीचे आदेश

By admin | Updated: June 22, 2017 00:23 IST

जिल्हा परिषदचे तत्त्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी शरद अहिरे यांच्या कार्यकाळात त्यांनी केलेल्या संपूर्ण कामांच्या तपासणीचे आदेश बुधवारला सांयकाळी धडकले.

उपायुक्तांचे आदेश धडकले : चौकशी समिती आज करणार विशेष तपासणीप्रशांत देसाई । लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हा परिषदचे तत्त्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी शरद अहिरे यांच्या कार्यकाळात त्यांनी केलेल्या संपूर्ण कामांच्या तपासणीचे आदेश बुधवारला सांयकाळी धडकले. जिल्हा परिषदे अंतर्गत सर्व विभागातील कामांची विशेष तपासणी आज गुरूवारपासून सुरू होणार आहे. यासंबंधीचे आदेश उपायुक्त (आस्थापना) कमलकिशोर फुटाणे यांनी बजावले आहेत. या आदेशामुळे जिल्हा परिषद वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषदचे तत्त्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांच्या स्थानांतरणानंतर शरद अहिरे हे २३ आॅगस्ट २०१६ ला भंडारा जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रूजू झाले. ते २ मे २०१७ पर्यंत कार्यरत होते. त्यांच्या या कार्यकाळात त्यांनी अधिनस्थ सर्व विभागात जी कामे केली त्या सर्व विभागातील कामांची विशेष तपासणी करण्याचे आदेश विभागीय आयुक्त कार्यालय विकास शाखा (आस्थापना) चे उपायुक्त कमलकिशोर फुटाणे यांनी २१ जूनला बजावले. या आदेशाची माहिती अत्यंत गोपणीय ठेवण्यात आली आहे. तत्त्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी शरद अहिरे यांच्या काळातील या विशेष तपासणीला गुरूवारपासून प्रारंभ होणार आहे. याबाबत त्यांनी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना बुधवारला तातडीचे पत्र पाठविले आहे. पत्र प्राप्त होताच येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये कमालिची अस्वस्थता पसरली आहे. शरद अहिरे यांचा कार्यकाळ बहुतांशी वादग्रस्त ठरला. चुकीचे निर्णय घेतल्याचा विरोधकांचा त्यांच्यावर आरोप होता. काही निर्णय थांबविल्याने अनेक प्रकरणे रखडल्याची बाब समोर आल्याची चर्चा जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांमध्ये आहे. सदर विशेष तपासणी पथकाची तपासणी करण्यासाठी येणाऱ्या पथकाला आवश्यक दस्ताऐवजासह योग्य ते सहकार्य करण्याच्या सूचना या माध्यमातून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. या आदेशाचे पालन जिल्हा परिषदेच्या सर्व विभागप्रमुखांनी देण्याचे निर्देशही देण्यात आले आहे. शरद अहिरे यांच्या कार्यकाळातील संपूर्ण कामाची विशेष तपासणी होत असल्याने यात मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी हे रजेवर असल्यामुळे यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरीता प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.