शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

महिलेवर अत्याचार; सात वर्षांची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 00:42 IST

शेतातील मजूर महिलेवर शारीरिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.पी. पांडे यांनी सात वर्ष सश्रम कारावास आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

ठळक मुद्देचिखलीची घटना : जिल्हा व सत्र न्यायालय

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शेतातील मजूर महिलेवर शारीरिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.पी. पांडे यांनी सात वर्ष सश्रम कारावास आणि तीन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. तीन वर्षापूर्वी पवनी तालुक्याच्या चिखली येथे एका शेतात महिलेवर अत्याचार करण्यात आला होता.प्रमोद अरविंद गजभिये (३८) रा.साठगाव ता.चिमूर जि.चंद्रपूर असे आरोपीचे नाव आहे. सदर पीडित महिला चंद्रपूर जिल्ह्यातील साठगाव येथील असून ती पवनी पोलीस ठाण्यांतर्गत चिखली येथील बाळू रामचंद्र फुलबांधे यांच्या शेतातील घराच्या बांधकामासाठी आली होती. त्याच गावातील प्रमोद गजभियेही दहा दिवसांपासून मजुरीवर येत होता. १३ जून २०१५ रोजी मजूर कामावर आले. सायंकाळी घरमालक फुलबांधे निघून गेले. सहकारी महिला ही निघून गेल्या. त्याठिकाणी पीडित महिला आणि प्रमोद गजभिये दोघेच उपस्थित होते. त्याठिकाणी कुणी नसल्याचे पाहून सदर महिलेवर बळजबरीने एका खोलीत नेवून अत्याचार केला. या प्रकाराने घाबरलेल्या महिलेने आपले गाव गाठले. चंद्रपूर जिल्ह्यातील भीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. परंतु घटनेचे ठिकाण भंडारा जिल्ह्यात येत असल्याने पोलिसांनी प्रकरण पवनी ठाण्याकडे वर्ग केले. आरोपी प्रमोद गजभिये विरुद्ध भादंवि ३७६ कलमान्वये गुन्हा दाखल केला.गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर बोरकुटे यांनी करून आरोपी प्रमोदला साठगाव येथून अटक केली. पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी करून गुन्ह्यात साक्ष पुरावा गोळा केले. त्यानंतर प्रकरण न्यायप्रविष्ठ करण्यात आले. गुन्ह्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर.सी. पांडे यांच्या न्यायालयात करण्यात आली.सरकारी अभियोक्ता अ‍ॅड.विश्वास तवले यांनी न्यायालयात योग्य बाजू मांडून साक्षीदार तपासले. गुन्ह्याचे स्वरुप व गंभीरता लक्षात घेऊन गुरुवारी न्यायालयाने प्रमोद गजभिये याला सात वर्ष सश्रम कारावास आणि तीन हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास सहा महिने कारावासाची शिक्षा ठोठावली. सदर गुन्ह्यात पोलीस निरीक्षक चकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार चंद्रशेखर पटले यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.

टॅग्स :Rapeबलात्कार