शहरं
Join us  
Trending Stories
1
खासदाराच्या ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
2
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
3
"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
4
अदानींनी खरेदी केली आणखी एक कंपनी, किती कोटींना झाली डील? शेअर्स सुस्साट...
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...
7
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
8
घरात सापडली संशयास्पद कागदपत्रे, पती देशद्रोही तर नाही ना? महिलेला आला संशय, त्यानंतर उचललं असं पाऊल   
9
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
10
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
11
Jagannath Rath Yatra 2025: जगन्नाथाच्या मूर्तीला डोळे, नाक आणि ओठ एवढेच अवयव का? त्यामागे आहे रहस्यमय कथा!
12
संजय लीला भन्साळींसोबत करीनाचं असं आहे नातं, विकीसमोर केला खुलासा, म्हणाली - "लव्ह अ‍ॅण्ड वॉरवाला..."
13
सरकारी नोकरीसाठी फक्त परीक्षा पास होणे पुरेसे नाही? CIBIL स्कोअरही महत्त्वाचा; एकाची नियुक्ती रद्द
14
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
15
'बाप माणूस' KL राहुलनं असं जपलं टीम इंडियातील आपल्या जबाबदारीचं भान!
16
चीनमध्ये गाढवे का गायब होत आहेत? ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय संकटात? काय आहे प्रकरण?
17
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
18
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
19
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?

काँग्रेसचे महामार्गावर निदर्शने

By admin | Updated: August 25, 2015 00:45 IST

केंद्र आणि राज्य शासनाच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने माजी मंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या नेतृत्वात...

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : केंद्र व राज्य शासनाविरुद्ध पर्दाफाश आंदोलनभंडारा : केंद्र आणि राज्य शासनाच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने माजी मंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या नेतृत्वात त्रिमूर्ती चौकात पर्दाफाश आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करुन सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या.आंदोलनादरम्यान केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी ललीत मोदीला मदत केल्याप्रकरणी निषेध करण्यात आला. स्वराज यांनी राजीनामा द्यावा, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांच्या कार्यकाळात झालेल्या व्यापमं घोटाळा प्रकरणी त्यांनी राजीनामा द्यावा, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे सिंधीया यांनी राजीनामा द्यावा, राज्य सरकारने सावकारी कर्जमाफीची घोषणा केली होती. परंतु कर्जमुक्ती मिळाली नसल्याने शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे, गतवर्षीच्या अवकाळी पाऊस व गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना अजूनपर्यंत न मिळालेली मदत मिळाली पाहिजे, एपीएल व बीपीएलधारकांना पूर्ववत अन्नधान्य मिळाले पाहिजे. एफआरपीबाबत निर्णय घेण्याबाबत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली पाहिजे, दुधाच्या दराबाबत शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, केंद्र व राज्याच्या सत्ताधारी मंत्र्यांचा भ्रष्टाचार, बोगस पदव्या आणि दडवलेल्या मालमत्तेसंदर्भात चौकशी झाली पाहिजे, महिलांना सुरक्षा मिळाली पाहिजे, बेरोजगारांना व युवकांना रोजगार मिळाले पाहिजे अशा घोषणा दिल्या.त्यानंतर शिष्टमंडळाने अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनिल पडोळे यांच्याशी चर्चा केली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, माजी आमदार आनंदराव वंजारी, माजी आमदार सेवक वाघाये, जिल्हाध्यक्ष जिया पटेल, प्रेमसागर गणवीर, प्रमिला कुटे, सीमा भुरे, सभापती विनायक बुरडे, सभापती नीळकंठ टेकाम, मधुकर लिचडे, अरविंद कारेमोरे, जिल्हा परिषद सदस्य होमराज कापगते, आकाश कोरे, अशोक कापगते, रेखा वासनिक, चुन्नीलाल वासनिक, नीळकंठ कायते, प्रेमकुमार वनवे, ज्ञानेश्वर राहांगडाले, प्रदिप बुराडे, मनोहर राऊत, प्रणाली ठाकरे, रमेश डोंगरे, वंदना पंधरे, मंदा गणवीर, शुद्धमता नंदागवळी, के.के. पंचबुद्धे, प्रसन्ना चकोले, भुषण टेंभुर्णे, अनिक जमा, अभिजीत वंजारी, नितीन बागडे, गणेश लिमजे, राजकपूर राऊत, सचिन घनमारे, मार्तंड भेंडारकर, प्रभू मोहतुरे, सुरेंद्र पाटील, मोहन पंचभाई, भुमेश्वर महावाडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)