शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

विरोधकांना आले ‘बुरे दिन’

By admin | Updated: June 27, 2015 00:48 IST

६० वर्षे सत्ता उपभोगणारे आता सत्तेबाहेर पडल्याने, भ्रष्टाचार खितपत पडलेल्या विरोधकांचे आता बुरे दिन सुरु झाले आहेत.

तुमसरात प्रचारसभा : मुख्यमंत्र्यांनी दिला इशारातुमसर : ६० वर्षे सत्ता उपभोगणारे आता सत्तेबाहेर पडल्याने, भ्रष्टाचार खितपत पडलेल्या विरोधकांचे आता बुरे दिन सुरु झाले आहेत. आता सहा महिन्यातच आम्हाला हिशोब मागत आहेत. राज्य सरकार सर्वसामान्यांच्या सर्वांगिन विकासासाठी प्रयत्नशील असून आम्ही भ्रष्टाचाऱ्यांची गय करणार नाही, असा ईशारा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ तुमसर येथे आले असता ते बोलत होते. मंचावर खासदार नाना पटोले, आ.चरण वाघमारे, शिशुपाल पटले, उपेंद्र कोठेकर उपस्थित होते. यावेळी ना.फडणवीस म्हणाले, सहा महिन्यात युती सरकारने शेतकऱ्यांना सात हजार कोटीची मदत दिली. यापूर्वी शेतकऱ्यांना कर्जासाठी १२ टक्के व्याज द्यावे लागत होते. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणी येत होत्या. त्यासाठी राज्य सरकारने कर्जाच्या पुनर्गठनाचा निर्णय घेतला. आता कर्जाची मर्यादा तीन वर्षानी वाढवून ती पाच वर्षापर्यंत करण्यात आली. यात एक वर्षापर्यंत बिनव्याजी कर्ज, दुसऱ्यावर्षी दोन टक्के तर तिसऱ्या वर्षीपासून टक्केवारी वाढवून शेतकऱ्यांना कर्ज परतफेडीकरिता सवलत दिली आहे. युती सरकार शेतकऱ्यांची पत तयार करण्याचे काम करीत आहे. विरोधक ‘अच्छे दिन कधी येणार’ असे टोमणे मारत असले तरी विरोधकांना न जुमानता सर्वसामान्याना न्याय कसा देता येईल, भ्रष्टाचार निर्मुलन कसे करता येईल, या दृष्टीने काम करीत आहे. भंडारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने १०० कोटी रुपयांचा धान घोटाळा केल्याचे चौकशीतून उघडकीस आल्याचे सांगून घोटाळे करणाऱ्यांची खैर नसल्याचे स्पष्ट केले.यावेळी खा.पटोले म्हणाले, जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये भाजपाची सत्ता होती. त्यावेळी केंद्रात व राज्यात युपीएचे सरकार होते. तरीदेखील भाजपने सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम केले. आता देशात व राज्यात भाजपचे सरकार असल्याने जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये विजयी करण्याचे आवाहन केले.आमदार चरण वाघमारे म्हणाले, राज्यात भंडारा जिल्हा परिषदेने जनहिताची सर्वाधिक कामे केली. शेतकऱ्यांच्या हितासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेतल्याचे सांगितले. प्रास्ताविक भाजप महामंत्री प्रदीप पडोळे यांनी केले. संचालन युवराज जमईवार यांनी तर आभारप्रदर्शन प्रमोद घरडे यांनी केले. यावेळी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)