शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

‘सूर रायझिंग स्टार’ मधून मिळणार प्रतिभावान गायकांना संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 00:05 IST

आपल्या प्रत्येकामध्ये कोणते ना कोणते टॅलेंट असते. अनेक कारणास्तव त्याला संधी मिळत नाही.

ठळक मुद्देकलर्स-लोकमत समूह उपक्रम : प्राथमिक फेरी १८ जानेवारीपासून

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आपल्या प्रत्येकामध्ये कोणते ना कोणते टॅलेंट असते. अनेक कारणास्तव त्याला संधी मिळत नाही. आर्थिक, कौटुंबिक, तर कधी व्यासपीठच न मिळाल्यामुळे अनेक कलावंत समाजासमोर येतच नाहीत. हीबाब लक्षात घेऊन जनसामान्यांतील सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्या कलाकौशल्य प्रतिभेला नवे पंख देण्यासाठी लोकमत समूह नेहमीच आघाडीवर असतो. विविध कार्यक्रम, स्पर्धा, टॅलेंट शो आयोजित करून या ‘उद्या’च्या सुपरस्टार्सना प्रकाशझोतात आणले जाते.सुरांचे देणं लाभलेल्या प्रतिभावान गायकांना एक नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी लोकमत आणि कलर्स वाहिनी आगळा-वेगळे व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे. ‘सूर रायझिंग स्टार’चे असे त्याचे नाव. कलर्स व लोकमतद्वारे आयोजित ही गायन स्पर्धा २० जानेवारी रोजी दुपारी २ वाजता अखिल सभागृह जिल्हा परिषद चौकच्या मागे गणेशपूर भंडारा येथे होणार आहे. यामध्ये ४ वर्षांपुढील मुले-मुली, स्त्री-पुरुष सहभागी होऊ शकतात.विशेष म्हणजे या प्रयत्नांना यंदा साथ मिळाली आहे, ती कलर्स वाहिनीची. मनोरंजनाच्या दुनियेत एकापेक्षा एक सरस कार्यक्रमांची निर्मिती करून छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांच्या घराघरांमध्ये कलर्सने बोलबाला निर्माण केला आहे. शुद्ध, कौटुंबिक, संस्कारक्षम कार्यक्रमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासोबत सामाजिक बांधिलकीचेही अनेक उपक्रम राबविले जातात. सदर होणाºया स्पर्धेची प्राथमिक फेरी १८ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता भंडारा पॅरामेडीकल कॉलेज (राजीव गांधी चौक युनियन बँकेच्या मागे) येथे होईल. प्राथमिक फेरीतील निवडक १५ स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात येईल. स्पर्धेच्या नाव नोंदणीसाठी ८०८७१६२३५२ या क्रमांकावर सकळी ११ ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान संपर्क करावा.लाइव्ह रिअ‍ॅलिटी शोचे ‘रायझिंग स्टार’‘रायझिंग स्टार’च्या निमित्ताने कलर्स वाहिनी घेऊन येत आहे, भारतातील पहिल्या लाइव्ह रिअ‍ॅलिटी शोचे दुसरे पर्व, ज्याद्वारे मोडल्या जाणार विचारांच्या चौकटी. आता तुम्ही म्हणाल, की विचारांची चौकट म्हणजे काय? समाजाने आपल्याभोवती अशा काही चौकटी निर्माण केल्या आहेत, ज्या आपल्या विकासाला मारक ठरतात. भाषा, जात, आर्थिक स्थिती, धर्म अशा विविध चौकटींची आज काहीही गरज नाही. अशा चौकटींचे बंधने झुगारून आपले टॅलेंट जगासमोर आणणाऱ्या गायकांना या चौकटी मोडण्यास मदत म्हणून या शोच्या माध्यमातून तुम्ही देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यांतून लाइव्ह व्होटिंग करू शकता. यामध्ये साथीला आहेत भारतातील तीन सुप्रसिद्ध महारथी परीक्षक गायक व संगीतकार शंकर महादेव, गायिका मोनाली ठाकूर आणि अभिनेता व गायक दिलजित दोसांज. परंतु खरे परीक्षक तर कलर्स वाहिनी पाहणारे देशातील १३० कोटी भारतीयच असणार आहेत. तर मग या सिझनमध्ये केवळ विचारांच्या चौकटीच नाही मोडल्या जाणार, तर देशातील प्रतिभावान गायकांचे नशीबही बदलणार आहे. कलर्स वाहिनीवर २० जानेवारीपासून दर शनिवार-रविवारी रात्री ९ वाजता सुरू होत आहे देशातील एकमेव लाइव्ह सिंगिंग रिअ‍ॅलिटी शो ‘रायझिंग स्टार’.