संजय साठवणे।लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : विधानसभा निवडणुकीची अधिसूचना शुक्रवार २७ सप्टेंबर रोजी जारी झाली. ४ ऑक्टोबर ही नामांकन दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. मात्र अधिसूचना प्रसिद्ध होताच दुसऱ्या दिवशी चवथा शनिवार, तिसºया दिवशी रविवारची सुटी आणि पुन्हा २ आॅक्टोबरला गांधी जयंतीनिमित्त सुटी. त्यामुळे नामांकन दाखल करण्यासाठी उमेदवारांना खºया अर्थाने पाचच दिवस मिळणार आहे. असे असले तरी अद्याप पर्यंत कोणत्याही पक्षाने आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केली नाही. शेवटच्या दोन दिवसात गर्दी होईल.४विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच राजकीय पक्षासह सर्वच जण कामाला लागले. २७ सप्टेंबरपासून नामांकन दाखल करण्याला प्रारंभ झाला. ४ ऑक्टोबरपर्यंत नामांकन दाखल करता येईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास पूर्ण आठवडा असला तरी अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर तीन दिवस सुट्या आल्या आहेत. त्यामुळे केवळ पाच दिवस नामांकनासाठी मिळणार आहेत. घटस्थापनेचा मुहूर्त नामांकनासाठी चांगला असला तरी सार्वजनिक सुटीमुळे अर्ज दाखल करता येणार नाही. परिणामी पहिले तीन दिवस अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या कमीच राहणार आहे. सोमवार ३० सप्टेंबर रोजी नामांकन दाखल करणाºयांची संख्या वाढू शकते. ३० सप्टेंबर व १ आॅक्टोबर असे दोन दिवस नामांकन दाखल झाल्यानंतर पुन्हा २ ऑक्टोबरला गांधी जयंती येत आहे. या सर्व कारणांमुळे शेवटचे दोन दिवस म्हणजे ३ व ४ आॅक्टोबर रोजी अर्ज दाखल करणाºयांची गर्दी होण्याची शक्यता आहे. तसेही शेवटच्या दोन दिवसातच अर्ज दाखल करणाºयांची झुंबड असते. साकोली विधानसभा क्षेत्रात पहिल्या दिवशी उमेदवारांनी नामांकन अर्जाची उचल केली. परंतु कुणीही अर्ज दाखल केला नाही. राजकीय पक्षांनीही आपल्या अधिकृत उमेदवारांच्या नावाची घोषणा केली नाही. त्यामुळे खºया अर्थाने नामांकन दाखल होईल ते ३ व ४ आॅक्टोबर रोजी. तीन दिवस आलेल्या सुट्यांचा तसा नामांकन दाखल करण्यावर कोणताही परिणाम होणार नाही. परंतु शेवटच्या दोन दिवसात निवडणूक विभागावर ताण मात्र वाढेल.पर्यावरणपूरक सामुग्रीचा वापरसाकोली विधानसभा निवडणुकीत पर्यावरणपूरक सामुग्रीचा वापर करण्यावर प्रशासनाने भर दिला आहे. त्यासाठी सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाºयांना सूचना देण्यात आल्या आहेत. सिंगलयुथ प्लास्टीक वापरू नये, पोस्टर, बॅनर, कटआऊट, होर्डींग, कटलरी, पाण्याचे पाऊच किंवा बॉटल प्लास्टीकच्या असतील तर त्याचा पर्यावरणावर प्रतिकूल परिणाम होतो. त्यामुळे पर्यायी साधनांचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
दारुच्या साठेबाजीवर करडी नजरनिवडणूक काळात दारुचा मोठ्या प्रमाणात वापर होण्याची शक्यता असते. त्यामुळे निवडणूक विभागाने दारुच्या साठेबाजीवर अंकुश आणण्यासाठी पोलिसांना निर्देश दिले आहेत. त्यानुसार साकोली विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावावर पोलीस करडी नजर ठेवणार आहेत. आचारसंहितेच्या काळात शांतता भंग होणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे. निवडणुकीच्या काळात दारुची वाहतूक होणार नाही याकडेही पोलीस लक्ष देणार आहेत. उत्पादन शुल्क विभागात कर्मचारी अपुरे असल्याने त्याचा फायदा मात्र दारु विक्रेते घेतील, परंतु पोलीस त्यांच्यावर नजर ठेऊन राहणार आहेत.