शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

जिल्ह्यातील ६३ प्रकल्पांमध्ये केवळ ३३ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 05:00 IST

जिल्ह्यात चार लघु प्रकल्प आहेत. त्यामध्ये ३६.६५ टक्के जलसाठा असून चांदपूर प्रकल्पात ४४.२७ टक्के, बघेडा २८.३५ टक्के, बेटेकर बोथली २९.४० टक्के आणि सोरना प्रकल्पात ९.५० टक्के जलसाठा आहे. या प्रकल्पात १५.६९५ दलघमी उपयुक्त साठा असून १.५३ दलघमी मृत साठा आहे. जिल्ह्यात ३१ लघु प्रकल्प असून या सर्व प्रकल्पाची क्षमता ५३.५४१ दलघमी आहे. सध्या या प्रकल्पात १७.२८६ दलघमी उपयुक्त साठा असून ४.२४८ दलघमी मृतसाठा आहे.

ठळक मुद्देमध्यम प्रकल्पात ३६.६५ तर लघु प्रकल्पात ३२.८५ टक्के

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्यानंतरही प्रकल्पातील जलसाठ्यांनी आता तळ गाठायला सुरुवात केली आहे. पाटबंधारे विभागांतर्गत येणाऱ्या ६३ प्रकल्पांमध्ये केवळ ३३.०४ टक्के जलसाठा आहे. ही जिल्ह्यासाठी धोक्याची घंटा असून अनेक गावात पाणी टंचाईसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि उन्हाळी सिंचनाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात चार लघु प्रकल्प आहेत. त्यामध्ये ३६.६५ टक्के जलसाठा असून चांदपूर प्रकल्पात ४४.२७ टक्के, बघेडा २८.३५ टक्के, बेटेकर बोथली २९.४० टक्के आणि सोरना प्रकल्पात ९.५० टक्के जलसाठा आहे. या प्रकल्पात १५.६९५ दलघमी उपयुक्त साठा असून १.५३ दलघमी मृत साठा आहे. जिल्ह्यात ३१ लघु प्रकल्प असून या सर्व प्रकल्पाची क्षमता ५३.५४१ दलघमी आहे. सध्या या प्रकल्पात १७.२८६ दलघमी उपयुक्त साठा असून ४.२४८ दलघमी मृतसाठा आहे. तुमसर तालुक्यातील कवलेवाडा, भंडारा तालुक्यातील आमगाव, सिल्ली आंबाडी, पवनी तालुक्यातील वाडी, भिवखिडकी या प्रकल्पांमध्ये तूर्तास ५० टक्केपेक्षा अधिक जलसाठा आहे. जिल्ह्यात माजी मालगुजारी अर्थात मामा तलावांची संख्या २८ आहे. या प्रकल्पाची साठवण क्षमता २५.४०४ दलघमी असून सध्या या प्रकल्पात केवळ ७.२५४ दलघमी जलसाठा आहे. प्रत्येक गावात मामा तलाव असले तरी २८ तलाव जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत आहेत. या तलावांची अवस्था बिकट झाली आहे.

मुबलक पाऊस तरीही प्रकल्प तळाला भंडारा जिल्ह्यात पावसाळ्यात मुबलक पाऊस झाला. अतिवृष्टी आणि महापुराने हाहाकार उडाला होता. असे असतानाही जिल्ह्यातील प्रकल्पांनी आता तळ गाठला आहे. पावसाळ्याच्या सुरूवातीला प्रकल्प तुडुंब भरले होते. मात्र आता या प्रकल्पात पाण्याचा ठणठणाट दिसत आहे. यामागच्या कारणाचा शोध घेतले असता अनेक प्रकल्पात गाळ साचला आहे. प्रकल्पाची साठवण क्षमता कमी होत आहे. तसेच सिंचनासाठी पाणी सोडण्यात येत असल्याने जलसाठा खालावत आहे.

 

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प