शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

भरपावसाळ्यात बावनथडी धरणात केवळ ३२ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:32 IST

तुमसर : संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने हाहाकार माजवला असला तरी तुमसर तालुक्यात केवळ तुरळक पाऊस पडत आहे. आंतरराज्य बावनथडी धरणात ...

तुमसर : संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने हाहाकार माजवला असला तरी तुमसर तालुक्यात केवळ तुरळक पाऊस पडत आहे. आंतरराज्य बावनथडी धरणात केवळ ३२ टक्के जिवंत पाणीसाठा उपलब्ध आहे. जाणवणेकरता पाण्याचा विसर्ग मागील तेरा दिवसांपासून सुरू आहे. धरण पाणलोट क्षेत्रात अल्पपावसामुळे धरण साठ्यात वाढ झाली नाही. मागील वर्षी जुलै महिन्यात धरणात ३४ टक्के पाणीसाठा होता.

बावनथडी आंतरराज्यीय धरणात भरपावसाळ्यात केवळ ३२ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. मागील वर्षी हा जलसाठा ३४ टक्के इतका होता. त्यानंतर मध्य प्रदेशात व बावनथडी धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पावसाने हजेरी लावल्यामुळे धरण शंभर टक्के भरले होते. पावसाळ्यात जुलै महिन्यात यावर्षी धरण पाणलोट क्षेत्रात अल्पपाऊस पडला. त्यामुळे धरणात केवळ ३२ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. मागील तेरा दिवसांपूर्वी बावनथडी धरणातून धान रोवणीकरिता १८ क्यूमेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. मध्य प्रदेशातही दमदार पावसाने हजेरी न लावल्यामुळे बावनथडी नदीपात्रात पाण्याची वाढ झालेली नाही. तसेच धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाची अजूनपर्यंत दमदार हजेरी लावली नाही. त्यामुळे धरणात पाणीसाठा वाढला नाही.

तुमसर तालुक्यातील शेतकऱ्यांनी धान पेरणी वेळेत केली होती. त्यानंतर पाऊस बेपत्ता झाला. शेतीला भेगा पडू लागल्या. त्यामुळे धानाचे परे वाळू लागले होते. धानाचे परे जिवंत राहावे व रोवणी व्हावी याकरिता बावनथडी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी धान रोवणी सुरू केली. बावनथडी धरणातून पाणी विसर्ग झाल्यामुळे सुमारे दहा हजार हेक्‍टर क्षेत्रातील धान रोहिणीला सुरुवात करण्यात आली.

बॉक्स

दमदार पावसाची प्रतीक्षा

मागील दोन दिवसांपासून तुमसर तालुक्यात पाऊस पडला नाही. कुठे तुरळक पाऊस पडल्याची नोंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दिवसा ऊन तर आकाशात ढगांची गर्दी दिसते. परंतु पाऊस पडत नाही. रविवारी दिवसभर उन्ह तापले. त्यामुळे उकाडा वाढला आहे. धरण क्षेत्रात दमदार पावसाची प्रतीक्षा अजूनही आहे.