शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

चांदपूर जलाशयात केवळ २८ फुट पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 22:21 IST

बावनथडी नदीपात्रात अल्प जलसाठा असल्याने सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पात केवळ दोन पंपगृहाने जलाशयात पाण्याचा उपसा करण्यात येत आहे. नदीचे पात्र बारमाही वाहणारे नसल्याने पावसाअभावी पंपगृह बंद करण्याची वेळ येणार आहे.

ठळक मुद्देगरजेनुसार सोडणार जलाशयाचे पाणी : सोंड्याटोला प्रकल्पात दोन पंपगृह सुरु

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : बावनथडी नदीपात्रात अल्प जलसाठा असल्याने सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पात केवळ दोन पंपगृहाने जलाशयात पाण्याचा उपसा करण्यात येत आहे. नदीचे पात्र बारमाही वाहणारे नसल्याने पावसाअभावी पंपगृह बंद करण्याची वेळ येणार आहे. यामुळे जलाशयातील जलसाठा लक्षात घेता गरजेनुसार पाणी सोडण्यात येणार आहे.सिहोरा परिसरात बावनथडी नदीवर साकारण्यात आलेल्या महत्वाकांक्षी सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाने कटू सत्य अनुभवले आहे. वीज, पंपगृहाची देखभाल आणि दुरुस्ती, निधी आणि अन्य समस्या घेऊन या प्रकल्पाने वाटचाल सुरु ठेवली आहे. परंतु गत वर्षापासून या प्रकल्प स्थळात समस्या निर्माण झालेल्या नाहीत. तब्बल वर्षभर प्रकल्पस्थळात वीज पुरवठा सुरु ठेवला आहे. वीज पुरवठा खंडीत होवू दिला नाही. यावर्षी ३४ हजार शेतकऱ्यांचे हित लक्षात घेत प्रकल्प स्थळात पाण्याचा उपसा करण्यासाठी त्यांनी रोखठोक प्रयत्न सुरु केले. प्रकल्पस्थळात निविदा विनाच शुक्रवारीपासून सहा पंपगृहाने पाण्याचा उपसा सुरु करण्यात आला आहे. बावनथडी नदीचे पात्र तीन महिनेच वाहणारे असल्याने चांदपूर जलाशय तातडीने ओव्हरफ्लो झाले पाहिजे, अशी भूमिका आमदार वाघमारे यांनी घेतल्याने जलाशयात १५ दिवसात आठ फुट पाण्याचा उपसा करण्यात आलेला आहे. जलाशयात २८ फुट पाण्याची साठवणूक करण्यात आली आहे. सध्या स्थित नदीचे पात्रात अल्प जलसाठा उपलब्ध असल्याने प्रकल्पस्थळात दोन पंपगृहाने पाण्याचा उपसा करण्यात येत आहे. सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प पाटबंधारे विभागाचे नियंत्रणात आहे. या विभागाला हस्तांतरीत झाले आहे. परंतु पाटबंधारे विभागात मनुष्यबळाचा अभाव असल्याने पाणी वाटप करताना माथापच्ची करण्याची वेळ येत आहे.दरम्यान सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पात तीन पंपगृह आहेत. दोन पंपगृह गेल्या वर्षापासून नागपुरात दुरुस्ती करिता ठेवण्यात आली असून आजपावेतो नादुरुस्त पंपगृह परतली नाही. यामुळे जलद गतीने पाण्याचा उपसा प्रभावित ठरत आहे. या कार्यात कंत्राटदारांचा बेजबाबबदारपणा कारणीभूत ठरत आहे. दरम्यान मध्यंतरी चांदपूर जलाशयाचे पाणी वाटप करण्यासाठी सभा घेण्यात आली होती.या सभेला सभापती धनेंद्र तुरकर, भाजपाचे तालुकाध्यक्ष राजेश पटले, मोहगावचे सरपंच उमेश कटरे, पाटबंधारे विभागाचे हटवार, मिरत आणि डिंकवार उपस्थित होते. या बैठकीत चांदपूर जलाशयाचे पाण्याचा दुरुपयोग होणार नाही. पाणी वाटप पूर्ण झाले असताना शेतकऱ्यांनी माहिती देण्याचे सांगण्यात आले. यामुळे जलाशयात उर्वरीत असणारे पाणी शेतकºयांचे उपयोगात येणार आहे. यावेळी शेतकरी उपस्थित होते.स्थिरीकरण योजना तारणारबावनथडी नदी पात्रात पाणी राहत नसल्याने परिसरात रबीचे हंगामात पाणी अभावी धानाचे उत्पादन घेता येत नाही. परिसरात शेतकऱ्यांना कायमस्वरुपी तारण्यासाठी लोकप्रतिनिंधी बपेरा-चांदपूर स्थिरीकरण योजना वैनगंगा नदीवर साकारण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या निर्णयाचे परिसरात स्वागत करण्यात आले आाहे. ही योजनांचे कामे जलद गतीने झाले पाहिजे अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.

टॅग्स :Chandpur Lakeचांदपूर जलाशय