शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटचा विमान उडवण्यास नकार; ४५ मिनिटे हायव्हॉल्टेज ड्रामा, एकनाथ शिंदे ताटकळले, मग...
2
भारतातील पाक गुप्तहेरांचा मास्टरमाईंड कोण?; पंजाबमधून अटक केलेल्या जसबीरचा शॉकिंग खुलासा
3
'इलॉन मस्क यांचं डोकं फिरलंय, मला नाही बोलायचं', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरसले
4
मोहम्मद युनूस यांची मोठी घोषणा, अखेर तारीख ठरली; बांगलादेशात कधी होणार निवडणूक? 
5
आधी चूक केली अन् आता घुमजाव...POK गमावण्याची धडकी मनात बसली; पाकिस्तान सरकारचा खुलासा
6
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
7
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
8
धावत्या ट्रेनमध्ये दरोडेखोराशी झटापट, पत्नीचं पर्स वाचवण्याच्या प्रयत्नात मुंबईतील डॉक्टरनं हात गमावला!
9
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
10
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
11
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
12
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
13
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
14
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
15
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
16
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
17
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
18
कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना
19
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
20
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!

दीक्षा अ‍ॅपद्वारे विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अभ्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 05:00 IST

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सुटीच्या कालावधीत ऑनलाईन अभ्यासक्रमाची आवड निर्माण व्हावी यासाठी संचालक राज्य शैक्षणिक संस्था व प्रशिक्षण परिषदेतर्फे दीक्षा अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी शाळांना सांगण्यात आले आहे.

ठळक मुद्देकृष्णमुरारी कटकवार विद्यालयाचा पुढाकार : इयत्तेनुसार शिक्षकांतर्फे सराव मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : संपूर्ण जगभर थैमान घातलेल्या कोरोनामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. यामुळे शाळा महाविद्यालय बंद करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी सुटीच्या कालावधीत ऑनलाईन अभ्यासक्रमाची आवड निर्माण व्हावी यासाठी संचालक राज्य शैक्षणिक संस्था व प्रशिक्षण परिषदेतर्फे दीक्षा अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी शाळांना सांगण्यात आले आहे.साकोली येथील कृष्णमुरारी कटकवार विद्यालयातील मुख्याध्यापक विजय देवगिरकर यांनी लॉकडाऊनच्या कालखंडात शालेय ग्रुपची निर्मिती केली. या माध्यमातून शिक्षकांशी संवाद साधत इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे व्हॉटस्अ‍ॅप ग्रूप तयार करण्यात आले. प्रत्येक वर्गशिक्षकांच्या माध्यमातून प्रत्येक वर्गाचे ग्रूप तयार करुन दीक्षा अ‍ॅपची सुरुवात करून विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रम सुरु करण्यात आले. या उपक्रमातून पहिली ते दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी कृतीयुक्त शिक्षण तसेच कृती करून आनंद घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. यासाठी क्रीडा संघटक शाहीद कुरैशी यांनी ऑनलाईन उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना विनंती करून फक्त सकाळी व संध्याकाळी दीड तास पाल्यांना मोबाईल देण्याची विनंती केली. पालकांचेही सहकार्य मिळत असून प्रत्येक वर्गशिक्षकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऑनलाईन धडे देण्यात येत आहेत.

टॅग्स :Studentविद्यार्थी