चोरट्यांचे रॅकेट : भंडारा ते तुमसर दरम्यानची घटनातुमसर : नागपूरवरुन गोंदियाकडे जाणाऱ्या साधारण प्रवासी गाडीत भंडारा ते तुमसर रेल्वेस्थानकादरम्यान अज्ञात चोरट्यांनी एका महिलेचा सोन्याच्या दागिन्यांचा पॉकेट लंपास केला. रेल्वे प्रवाशी धावत्या रेल्वेगाडीत सुरक्षित होण्याचा रेल्वे प्रवाशांचा दावा यामुळे फोल ठरला आहे.मध्य प्रदेशातील कटंगी तालुक्यातील परसवाडा येथील चित्ररेखा बिसेन सात वर्षीय मूलासोबत रविवारी सकाळी सात वाजता नागपूर रेल्वे स्थानकावरुन पॅसेंजर गाडीत बसल्या. तुसमर रोड रेल्वेस्थानकावर ती सकाळी ९.३० वाजता उतरली. नंतर पुढच्या प्रवासाकरिता चित्ररेखा आपल्या मूलासोबत तुमसर-तिरोडा प्रवासी गाडीत बसली.रेल्वेगाडीत बसल्यानंतर चित्ररेखाने आपली पिशवी उघडून बघितले तेव्हा तिला दागिन्यांचा पॉकेट लंपास झाल्याचे कळले. चित्ररेखाला प्रवाशी गाडीत धक्का बसला यात ती बेशुध्द पडली. डब्यातील प्रवाशांनी चौकशी केल्यावर तिने महिती दिली. गोबरवाही रेल्वेस्थानकावर प्रवाशी गाडी थांबल्यावर चित्ररेखाने गोबरवाही रेल्वे स्टेशनमास्तरकडे तक्रार नोंदविली. नागपूर ते गोंदिया रेल्वे स्थानकादरम्यान चोरट्यांची टोळी सक्रिय असल्याची माहिती आहे. या मार्गावर अनाधिकृत व्हेंडर्स रेल्वे डब्यात खाद्य पदार्थांची विक्री करतात. असामाजिक तत्वांच्या टोळ्या सर्रास रेल्वे प्रवाशांना लुबाडणे, चोरी करणे, जुगार खेळणे असा प्र्रकार मागील अनेक महिन्यापासून सुरु आहे. टोळीने ते प्रवास करीत असल्याने सामान्य प्रवासी येथे हतबल आहेत. रेल्वे प्रशासनाने १८२ क्रमांकावर तक्रार करण्याचे आवाहन केले, पंरतु ते केवळ कागदावर असल्याच्या प्रतिक्रिया रेल्वे प्रवाशांनी दिल्या. यात चित्रलेखा यांचे दागिने चोरीला गेल्याने त्यांना लाखोंचा फटका बसला आहे. वृत्त लिहेस्तो चोरट्यांचा सुगावा लागला नव्हता. (तालुका प्रतिनिधी)
एक लाखांचा ऐवज लांबविला
By admin | Updated: June 8, 2015 01:02 IST