शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
3
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
4
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
5
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
6
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
7
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
8
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
9
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
10
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
11
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
12
जीएसटी 2.0चा धमाका : क्वीड vs एसप्रेसो vs अल्टो, देशातील सर्वात स्वस्तकार कोणती? 'या' कारवर मिळेल सर्वाधिक फायदा
13
Kieron Pollard: किरॉन पोलार्डचा वर्ल्ड रेकॉर्ड! 'असा' पराक्रम करणारा जगातील पहिलाच
14
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
15
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
16
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
17
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...

एक लाख हेक्टरमधील धानपीक धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 05:01 IST

भंडारा जिल्ह्यात यावर्षीच्या खरीप हंगामात धानपिकासाठी एक लाख ६१ हजार ४९४ हेक्टर क्षेत्र निर्धारित करण्यात आले. यापैकी गत आठवड्यापर्यंत एक लाख ५२ हजार १७१ क्षेत्रात प्रत्यक्ष लागवड करण्यात आली. खरीप हंगामाच्या सुरुवातीला पावसाने साथ दिली. त्यामुळे धान लागवडीला प्रारंभ करण्यात आला. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली. अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागले.

ठळक मुद्देकीडींचा प्रादुर्भाव : शेतकरी संकटात, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी म्हणतात, प्रादुर्भाव केवळ भंडारा तालुक्यातच

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात गत १५ दिवसांपासून ढगाळ वातावरण व पावसामुळे जिल्ह्यातील जवळपास एक लक्ष हेक्टर क्षेत्रात गादमाशी, खोडकिडा तसेच पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादूर्भाव आढळून आला आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला असून उपाययोजनेसाठी केविलवाणा प्रयत्न करीत आहे.भंडारा जिल्ह्यात यावर्षीच्या खरीप हंगामात धानपिकासाठी एक लाख ६१ हजार ४९४ हेक्टर क्षेत्र निर्धारित करण्यात आले. यापैकी गत आठवड्यापर्यंत एक लाख ५२ हजार १७१ क्षेत्रात प्रत्यक्ष लागवड करण्यात आली. खरीप हंगामाच्या सुरुवातीला पावसाने साथ दिली. त्यामुळे धान लागवडीला प्रारंभ करण्यात आला. मात्र त्यानंतर पावसाने दडी मारली. अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागले. २० दिवसानंतर पावसाने समाधानकारक हजेरी लावली. त्यानंतर जिल्ह्यात धडाक्याने रोवणीला प्रारंभ झाला. धान पिकाला पोषक असे वातावरण असल्यामुळे धान डौलाने उभे होते. परंतु ऑगस्ट महिन्याच्या पंधरवाड्यानंतर जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. कधी ढगाळ वातावरणात तर कधी दमदार पावसाची हजेरी यामुळे डौलाने उभे असलेले धानपीक धोक्यात आले. वातावरण बदलाने किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. अनेक ठिकाणी तर धानपिक नष्ट झाले आहे. भंडारा जिल्ह्यातील भंडारा, पवनी, मोहाडी, तुमसर, साकोली, लाखनी, लाखांदूर तालुक्यामध्ये गादमाशी, खोडकिडा व पाने गुंडाळणाºया अळीचा प्रादूर्भाव असल्याच्या तक्रारी आहेत. मात्र यावर उपाययोजना करण्यास जिल्हा कृषी विभाग उदासिन दिसून येत आहेत. केवळ कागदावरच उपाययोजना न ठेवता प्रत्यक्षात शेतकºयांना याचा फायदा व्हावा, यासाठी पुढाकार घेण्याची नितांत गरज आहे.अनुदानावर कीटकनाशक औषधींचे वितरण कराभंडारा जिल्ह्याला गत चार वर्षांपासून दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. यावर्षी मोठ्या आशेने शेतकºयांनी धान पिकाची लागवड केली. मात्र निसर्गाच्या वक्रदृष्टीने यावर्षीही शेतकरी संकटात सापडला आहे. धानपिकावर मोठ्या प्रमाणात किडींचा प्रादूर्भाव आहे. किटकनाशके महागडी असल्याने शेतकऱ्यांना ती परवडणारी नाही. शासनाने गरजू शेतकऱ्यांना अनुदानावर किटकनाशक औषधींचे वितरण केल्यास शेतकऱ्यांना काहीप्रमाणात दिलासा मिळू शकतो, यासाठी अधिकारी व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरज आहे.जिल्ह्यातील भंडारा तालुक्यातील ३०० हेक्टर क्षेत्र वगळता कोणत्याही तालुक्यात किडींचा प्रादुर्भाव नाही. सध्या स्थितीत १४८ लिटर किटकनाशक औषधी कृषी विभागाकडे उपलब्ध आहे. पुन्हा औषधीची मागणी शासनाकडे करण्यात आली असून लवकरच प्राप्त होणार आहे. किडींवर उपाययोजना करण्यासाठी कृषी अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष शेतात जावून पाहणी करुन मार्गदर्शन करीत आहेत.- हिंदूराव चव्हाण,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, भंडारा

टॅग्स :agricultureशेती