शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू, दहेगाव जंगल परिसरातील घटना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2022 12:10 IST

जंगलात सरपण आणण्यासाठी गेलेल्या एकावर बिबट्याने हल्ला चढवत १०० मीटर फरफटत ओढत नेऊन ठार केले.

भंडारा : जंगल परिसरात जलाऊ इंधन (सरपण) गोळा करण्यासाठी गेलेल्या एकावर बिबट्याने हल्ला चढवत ठार केल्याची घटना घडली. ही घटना आज २७ जानेवारी रोजी सकाळी ७ च्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील दहेगाव जंगल परिसरात घडली.

प्रमोद चौधरी (वय ५५, रा. लाखांदूर) असे बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. दहेगाव जंगल परिसरात बिबट्यासह अन्य वन्य प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असतांना देखील परिसरातील नागरिक नियमित जंगल परिसरात जलाऊ इंधन गोळा करण्यासाठी जात असल्याची माहिती आहे. दरम्यान,  आज सकाळी प्रमोद गावातील काही साथीदारांसह दहेगाव जंगल परिसरांत जलाऊ इंधन गोळा करण्यासाठी गेला होता. यावेळी शिकारिच्या शोधात दबा धरुन बसलेल्या बिबट्याला सकाळच्या सुमारास जंगल क्षेत्रात काही नागरिक आढळून येताच त्याने हल्ला चढविला. 

बिबट्याने प्रमोदला तब्बल १०० मीटरपर्यंत घनदाट जंगलात फरफटत ओढत नेऊन ठार केले. प्रमोदच्या साथीदारांनी कुटुंबियांसह गावकरी व वनविभागाला याबाबत माहिती दिली. स्थानिक लाखांदूर वनविभागाचे वनपरिक्षेत्राधिकारी रुपेश गावित, वनरक्षक एस जी खंडागळे, जी डी हत्ते, प्रफुल राऊतसह अन्य वनकर्मचारी व गावकऱ्यांनी घटनास्थळ गाठले. यावेळी वनकर्मचाऱ्यांनी बिबट्याच्या हल्ल्याप्रकरणी घटनास्थळासह मृतदेहाचा पंचनामा करुन शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. 

या घटनेची पोलीस विभागाने देखील नोंद केली आहे. तर, शासनाने बिबट्याच्या हल्ल्यात जीव गमावलेल्या प्रमोदच्या कुटुंबियांना तत्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :Deathमृत्यूleopardबिबट्या