लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सलग आठवड्याभरानंतर कोरोनाने एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत मृत पावलेल्यांची संख्या ११३९ झाली आहे. उल्लेखनीय म्हणजे शुक्रवारी ४०३ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मातही केली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात सक्रीय रुग्णांची संख्या १३८२ वर आली आहे. जिल्ह्यात शुक्रवारी २०७९ नागरिकांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यापैकी २३२ व्यक्ती कोरोनाबाधित आढळले. तालुकानिहाय आकडेवारीमध्ये भंडारा येथे ८३, मोहाडी ३०, तुमसर २८, पवनी १४, लाखनी ३६, साकोली १९, लाखांदूर २२ रुग्ण आढळले. आतापर्यंत सर्वात जास्त कोरोनाबाधित भंडारा तालुक्यात आढळले असून त्यांची संख्या २७ हजार ४२२ इतकी आहे. त्याचप्रमाणे मोहाडी तालुक्यात आतापर्यंत ५०२४, तुमसर ८३०९, पवनी ६५६७, लाखनी ७८५१, साकोली ८३६९ तर लाखांदूर तालुक्यात ३२७७ रुग्ण आढळून आले आहेत.उल्लेखनीय म्हणजे आतापर्यंत कोरोनाने बाधित रुग्णांची संख्या ६६ हजार ८१९ इतकी असून आतापर्यंत ६४ हजार २९८ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात पाच लक्ष ३७ हजार ७९६ व्यक्तींची कोरोना चाचपणी करण्यात आल्याचे समजते.यात एक लक्ष १८ हजार ८०८ व्यक्तींची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. त्यापैकी १८ हजार ८८ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळले. तसेच चार लक्ष १८ हजार ७०६ जणांची ॲन्टिजेन तपासणी करण्यात आली. त्यापैकी ४८ हजार ६०८ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळले आहे. ट्रू नॅट तपासणी २८६ जणांची करण्यात आली. १२३ व्यक्ती बाधित आढळले. सक्रीय रुग्ण संख्येतही भंडारा तालुका आघाडीवर असून तालुक्यात ४२४ व्यक्ती सक्रीय आहेत. तसेच मोहाडी तालुक्यात १३३, तुमसर २२८, पवनी ७३, लाखनी २८१, साकोली १७९, लाखांदूर ६४ रुग्णांचा समावेश आहे. तालुकानिहाय मृत पावलेल्या कोरोना रुग्ण संख्येत भंडारा तालुक्यातील ५२०, मोहाडी १००, तुमसर १२९, पवनी ११३, लाखनी ९९, साकोली १०७ तर लाखांदूर तालुक्यातील ७१ जणांचा समावेश आहे.तिसऱ्या लाटेत आतापर्यंत सहा अजार ७०८ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यापैकी पाच हजार ३२१ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली असून १३८२ सक्रीय रुग्ण आहेत. तिसऱ्या लाटेत पाच जणांचा मृत्यू झाला असून त्यात मृत्यूदर ०.०७ टक्के आहे. तसेच एकूण मृत्यूसंख्येचा विचार केल्यास मृत्यूदर ०१.७० इतका आहे. तापाची कोणतेही लक्षणे आढळल्यास त्वरीत तपासणी करून घ्यावी, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
भंडारा झाला कोरोनाचा हाॅटस्पॉट - जिल्ह्यात मागील तीन आठवड्यांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यातच भंडारा आणि तुमसर तालुक्यातील बाधितांचा आलेख सातत्याने उंचावत आहे. भंडारा तालुक्यात सद्य:स्थितीत ४२४ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, तर तुमसर तालुक्यात २२८ रुग्ण आहेत. त्यामुळे भंडारा तालुका कोरोनाचा हाॅटस्पॉट ठरला आहे.