पंचायत समितीचा पुढाकार: समस्या सोडविण्याचे आश्वासनलाखनी : पंचायत समितीच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या अभिनव उपक्रमाद्वारे ग्रामपंचायत किटाडी येथे एक दिवस मजुरांसोबत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य वर्षा रामटेके उपस्थित होते. अतिथि म्हणून पंचायत समिती सदस्य मोनाली गाढवे, तहसीलदार राजु शक्करवार, गटविकास अधिकारी के.के. ब्राम्हणकर, सहाय्यक गटविकास अधिकारी मिलींद बडगे, विस्तार अधिकारी श्रीकांत नागलवाडे, पंचायत समिती सदस्य वंदना गवळी, सरपंच घाटबांधे आदि उपस्थित होते. याप्रसंगी स्वच्छता व हागणदारीमुक्त गाव योजनेची माहिती देण्यात आली. एक दिवस मंजुरासोबत या शासकीय उपक्रमाची माहिती ग्रामस्थ व उपस्थितांना देण्यात आली. कार्यक्रमाला कृषि विभागाचे अधिकारी, वनविभागाचे अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, तलाठी व स्थानिक गावकरी उपस्थित होते. संचालन यशवंत शेंडे यांनी केले. (तालुका प्रतिनिधी )
एक दिवस मजुरांसोबत
By admin | Updated: October 3, 2016 00:33 IST