शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

एक दिवसीय हत्तीरोग औषधोपचार मोहीम

By admin | Updated: February 10, 2017 00:35 IST

१० फेब्रुवारी हा दिवस आरोग्य विभागाने हत्तीरोग दिन म्हणून पाळण्याचा निर्णय घेतला असून पल्स पोलिओ

भंडारा : १० फेब्रुवारी हा दिवस आरोग्य विभागाने हत्तीरोग दिन म्हणून पाळण्याचा निर्णय घेतला असून पल्स पोलिओ मोहिमेच्या धर्तीवर १० ते १४ फेब्रुवारी या कालावधीत ग्रामीण व शहरी भागात डिईसी व अ‍ॅल्बेन्डाझोल गोळया प्रत्यक्षात खाऊ घालण्याचा कार्यक्रम राबविला जाणार आहे. हत्तीरोग हा डासांमुळे फैलावणारा रोग असून क्युलेक्स डासाची मादी याचा प्रसार करण्यास कारणीभूत असते. जंतू असलेली मादी चावल्यास प्रत्येकच वेळी संसर्ग होतोच असे नाही, कारण हत्तीरोगाचे जंतू हे मादी डासामार्फत त्वचेवर सोडले जातात. त्यानंतर जंतूना स्वत: त्वचेवर जखम अथवा छिद्र शोधून शरीरात शिरण्याचे काम करावे लागते. डासाच्या वारंवार चावल्यानंतर काही व्यक्तीनांच हत्तीरोगाची लागण होते. हत्तीरोग दुरीकरणासाठी दरवर्षी हत्तीरोग समस्याग्रस्त भागात एक दिवसीय डीईसी व अल्बेंडाझोल गोळयांची सामुदायिक औषधोपचार मोहिम राबवून देशातून हत्तीरोग समुळ उच्चाटन करण्याचा आरोग्य विभागाचा उद्देश आहे. दोन वषार्खालील बालके, गरोदर माता व आजारी रुग्णांना या कार्यक्रमातून वगळायचे आहे. ही मोहिम ग्रामीण भागात १० ते १२ फेब्रुवारी व शहरी भागात १० ते १४ फेब्रुवारी या कालावधीत राबविली जाणार आहे. डीईसी गोळयांची फक्त एक मात्रा वषार्तून एकदाच म्हणजे राष्ट्रीय हत्तीरोग दिवशी घ्यावयाची आहे. या गोळयांची एक मात्रा रुग्णाचे शरीरातील सर्व मायक्रोफायलेरीयाचा नाश करते. त्यामुळे हत्तीरोगाचा प्रसार रोखण्यास मदत होते. डीईसी गोळया उपाशीपोटी घेऊ नये, उपाशी पोटी घेतल्यास मळमळ उलटी सारखा किरकोळ त्रास होऊ शकतो म्हणून डिईसी गोळया या काहीतरी खाल्यानंतरच घ्याव्यात, असे जिल्हा हिवताप अधिकारी भंडारा यांनी कळविले आहे. (नगर प्रतिनिधी)