शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण समितीच्या सभेत वाचला मूलभूत समस्यांचा पाढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 00:54 IST

गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या पर्यावरण व्यवस्थापन समितीची सभा गोसीखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता ए.आर. कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेमध्ये पुनर्वसन कामाची प्रगती, धरणामधील नागनदी व पिवळ्या नदीचे प्रदूषण, घोडाझरी मध्ये सिंचनासाठी पाणी सोडणे गोसीखुर्द धरणाचे सौंदर्यीकरण वाढविणे, .....

ठळक मुद्देवाही वसाहतीत सभा : नागनदीचे प्रदूषण, पुनर्वसनावर चिंतन

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या पर्यावरण व्यवस्थापन समितीची सभा गोसीखुर्द प्रकल्पाचे मुख्य अभियंता ए.आर. कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभेमध्ये पुनर्वसन कामाची प्रगती, धरणामधील नागनदी व पिवळ्या नदीचे प्रदूषण, घोडाझरी मध्ये सिंचनासाठी पाणी सोडणे गोसीखुर्द धरणाचे सौंदर्यीकरण वाढविणे, धरणामध्ये वाढत असलेल्या इकॉर्नियाचे निर्मूलन करणे, पुनर्वसनस्थळी सर्व नागरी सुविधा पुरविणे आदी विषयावर चर्चा होवून उपाययोजना करण्याचे संबंधित विभागाला निर्देश देण्यात आले.नागपूर शहरातील नागनदी व पिवळी नदीच्या सांड पाण्यामुळे, गोसीखुर्द धरणातील पाणी प्रदूषित झाले आहे. त्यामुळे भंडारा, पवनी या शहरांना व नदीकाठच्या गावांना प्रदूषित पाणी प्यावे लागत आहे. आरोग्याच्या दृष्टीने, मासेमारांच्या दृष्टीने, भविष्यात या प्रदूषित पाण्याचा गंभीर परिणाम होवून शेतीवरही परिणाम होणार आहे.या ज्वलंत मुद्यांवर सर्वच प्रतिनिधींनी आवाज उचलून नागपूर महानगर प्रतिनिधीला जाब विचारताच त्यांनी प्रक्रिया केलेल्या शुद्ध पाण्याचा जुलै महिन्यापासून दर्जा सुधारला असल्याचे सांगितले. पण समाधान झाले नाही. त्यामुळे नागपूर मनपाच्या भांडेवाडी जलशुद्ध प्रकल्पाला भेट देवून सत्यस्थिती जाणून घेण्याचे ठरविण्यात आले.यावर्षी गोसीखुर्द धरणाचा जलस्तर वाढविणार असल्यामुळे बुडीत क्षेत्रातील गावांचे स्थलांतर करण्याचे ठरविण्यात आले आहे. धरणाच्या लाभ क्षेत्रातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना धरणाचे सिंचनाचे पाणी देण्यावर भर दिला जाणार आहे. पुनर्वसनस्थळी सर्व नागरी सुविधा पुरवून गावठाणे जि.प. हस्तांतरीत केले आहे. दर्जेदार पुनर्वसनाची काही कामे एनबीसी ला देण्यात आलेली आहे.या कामांची पाहणी करून जिल्हाधिकारी यांच्या मंजुरीने कामे प्रस्तावित करण्याचे ठरविण्यात आले आहे. गोसीखुर्द धरणाचे सौंदर्यीकरण करून याकरिता एक आराखडा तयार करण्याचे ठरविण्यात आले. धरणामध्ये वाढत असलेल्या इकॉर्निया वनस्पती निर्मूलन करण्याकरिता गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली कायमस्वरुपी उपाययोजना केली जाणार आहे. अनेक राहिलेल्या गावांचे पुनर्वसन केले जाणार आहे.वाही वसाहत येथे झालेल्या या सभेत समितीचे अशासकीय सदस्य विलास भोंगाडे, विठोबा समरीत, गोविंद भेंडारकर, अधीक्षक अभियंता जे.एम. शेख, कार्यकारी अभियंता आर.एच. शर्मा, अभियंता रायपुरे, भंडारा व नागपूर जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी, पुनर्वसन अधिकारी, नागपूर मनपाचे अधिकारी, वनविभाग, आरोग्यविभागाचे वरिष्ठ अधिकारी, शाखा अभियंता पी.डी. चवरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Gosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्पenvironmentवातावरण