गुरुवारी २२६१ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात भंडारा तालुक्यात ११७, मोहाडी ११०, तुमसर २९, पवनी ५८, लाखनी २१, साकोली ०८ आणि लाखांदूर तालुक्यात एक असे २४४ रुग्ण आढळून आले. गुरुवारी कुणाचाही कोरोनाने मृत्यू झाला नाही. आतापर्यंत जिल्ह्यात ३३२ व्यक्तींचा कोरोनाने बळी गेला आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना केल्या असून, भंडारातील बाजारपेठेतील वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत केली आहे. मात्र त्यानंतरही कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे.
बॉक्स
सर्वाधिक रुग्ण भंडारा तालुक्यात
जिल्हा मुख्यालय असलेल्या भंडारा शहरासह तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. गत दहा दिवसांत ७०६ कोरोना रुग्ण आढळून आले आहे. आतापर्यंत आढळलेल्या रुग्णातही सर्वाधिक ६८०२ रुग्ण भंडारा तालुक्यातीलच आहे, तर ॲक्टिव्ह रुग्णही भंडारा तालुक्यातच अधिक असून, या रुग्णांची संख्या ६६१ आहे. शहरात कोरोना नियमांचे पालन करताना नागरिक टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येत आहे. मोठ्या प्रमाणात विविध ठिकाणी गर्दी होत आहे. अनेक जण मास्क लावत नाही. त्यामुळे कोरोना संसर्गाचा अधिक धोका आहे. नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन गरजेचे झाले आहे.