शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अरे.... काही तर सांगा आम्हाला; कंपनीत काम करणाऱ्यांच्या नातेवाईकांचा जीव रडकुंडीला

By नरेश डोंगरे | Updated: January 24, 2025 22:38 IST

पोलीस, सुरक्षा रक्षकांसमोर केविलवाणा आग्रह, ऑर्डनन्स फॅक्टरीत भयानक स्फोट झाला आणि त्यात अनेकांचा बळी गेल्याची हादरवून टाकणारी बातमी शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास भंडारा जिल्ह्यात पसरली.  

नरेश डोंगरे 

लोकमत न्यूज नेटवर्क 

भंडारा : एवढी भयानक घटना घडून पाच तास झाले. तुम्ही आम्हाला अंदरही जाऊ देत नाही आणि आत मध्ये काय झाले, काय नाही, ते सांगतही नाही. आम्ही कसे करायचे, असा केविलवाना प्रश्न भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे नातेवाईक बाहेर उपस्थितांसमोर करीत होते. 

ऑर्डनन्स फॅक्टरीत भयानक स्फोट झाला आणि त्यात अनेकांचा बळी गेल्याची हादरवून टाकणारी बातमी शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास भंडारा जिल्ह्यात पसरली. त्यामुळे या फॅक्टरीत काम करणाऱ्या नातेवाईकांच्या हृदयाची धडधड वाढली. ते मिळेल त्या साधनाने फॅक्टरी परिसरात आले. तोपर्यंत फॅक्टरीच्या इस्पितळात एकाचा मृतदेह आणण्यात आला होता. अन्य जखमींना खाजगी इस्पितळात हलविण्यात आले होते. तर इमारतीच्या मलब्यामध्ये अनेक जण दबून असल्याचे वृत्त बाहेर सांगितले जात होते. त्यामुळे आतमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांच्या जीवाची घालमेल वाढली होती.

कर्मचाऱ्यांना आत मध्ये मोबाईल नेण्यास मनाई होती.  दुपारचे साडेतीन वाजले तरी आत मध्ये कोण दबून आहेत आणि कोण सुखरूप आहेत, त्याबद्दलची कसलीही माहिती बाहेर आली नव्हती. त्यामुळे नातेवाईकांचा जीव अक्षरशः रडकुंडीला आला होता. कुणाची बहीण, कुणाची मुलगी, कुणाचा मुलगा, तर कुणाचा भाऊ फॅक्टरीच्या आत असल्याने तो कसा आहे, हे जाणून घेण्यासाठी हे बिचारे नातेवाईक केविलवाणी धडपड करत होते. अनेकदा त्यांनी फॅक्टरीच्या आत मध्ये जाण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षारक्षक आणि पोलिसांनी त्यांना तिथेच थोपवून धरल्याने त्यांच्या भावनांचा बांध फुटला.  त्यांनी सुरक्षारक्षक व पोलिसांसमोर आमच्या नातेवाईकाचे आत हाल कसे आहे, ते आम्हाला सांगा असा आग्रह धरला. पोलीस, सुरक्षा रक्षकही हतबल 

सुरक्षेची जबाबदारी सांभाळणारे पोलीस तसेच सुरक्षा रक्षकही हतबल होते. त्यांना कसलीही माहिती नव्हती.  आतमध्ये बचाव कार्य सुरू आहे, एवढेच त्यांना ठाऊक होते. जखमी किंवा मृता बद्दल कसलीही माहिती नसल्याने संतप्त नातेवाईकांची समजूत घालता घालता, त्यांचीही अवस्था वाईट झाली होती. 

अन त्या माऊलीच्या अश्रूंचा बांध फुटला 

किरण नामक तरुण फॅक्टरीत कामाला होता. प्रमोशनमुळे त्याने नवीन पदाची जबाबदारी नुकतीच घेतली होती आणि आजच अशी घटना घडल्याने त्याची आई तसेच नातेवाईक धावत पळत फॅक्टरी परिसरात पोहोचले. किरण कुठे आहे, कसा आहे, हे जाणून घेण्यासाठी त्या धडपडत होत्या. अखेर दुपारी साडेतीनच्या सुमारास त्यांच्या मोबाईल वर आत मधून एक फोन आला. प्रत्यक्ष किरणं बोलला आई,  मी सुखरूप आहे, चिंता करू नको, हे ऐकताच त्याच्या आईच्या भावनांचा बांध फुटला. त्या हमसून हमसून रडू लागल्या. 

अनेकांच्या भावनांचा कोंडमारा अनेक नातेवाईकांच्या भावनांचा कोंडमारा झाला होता. आतमध्ये असलेले आपले नातेवाईक कसे आहे,  ते त्यांना तब्बल पाच तासानंतर कळाले. तोपर्यंत अनेक नातेवाईक हवालदिल होते.

टॅग्स :Blastस्फोट