शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांनाही वाङ्मयीन संस्कृतीचे भान असावे

By admin | Updated: May 6, 2016 00:38 IST

वाङ्मयाचा मानवी मनावर उदात्त, व्यापक मानवतावादी संस्कार होत असतो. वाङ्मयीन जाण असलेला माणूस एकांगी अभिनेवेशी किंवा संकुचित वृत्तीचा राहत नाही.

लखनसिंह कटरे यांचे प्रतिपादन : युगसंवादचा कवी आणि कविता उपक्रम उत्साहातभंडारा : वाङ्मयाचा मानवी मनावर उदात्त, व्यापक मानवतावादी संस्कार होत असतो. वाङ्मयीन जाण असलेला माणूस एकांगी अभिनेवेशी किंवा संकुचित वृत्तीचा राहत नाही. म्हणूनच प्रशासकीय सेवांमधील व्यक्तींनीही वाङ्मयीन संस्कृतीचे भान जपणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध कवी लखनसिंह कटरे यांनी व्यक्त केले. विदर्भ साहित्य संघ शाखा लाखनी, मैफल लाखनी आणि युगसंवाद वाङ्मयीन आणि सांस्कृतिक संस्था भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने लाखनी येथील समर्थ विद्यालयात संपन्न झालेल्या कवी आणि कविता या उपक्रमाच्या दुसऱ्या भागात निमंत्रीत कवी म्हणून लखनसिंह कटरे सहभागी झाले होते. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.संजय पोहरकर होते. याप्रसंगी प्रा.बे. तु. आगाशे, डॉ.अनित नितनवरे, डॉ.गिरीश सपाटे आदी उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या प्रारंभी कटरे यांच्या मौलिक काव्यकर्तृत्वाप्रीत्यर्थ अध्यक्ष डॉ.पोहरकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व ग्रंथभेट देवून त्यांना सन्मानित करण्यात आले. यानंतर त्यांची मुलाखत डॉ.सपाटे यांनी घेतली. या मुलाखतीतून कवी कटरे यांनी आपल्या वैयक्तिक, सामाजिक व वाङ्मयीन जीवनाचा भेदक आलेख मांडला. डाव्या, उजव्या विचारधारांच्या प्रवाहात वाहून न जाता मी निरपेक्षपणे जगलो. प्राचीन अर्वाचिन वाङ्मय, फुले आंबेडकर व सावरकरांचे वाङ्मय तसेच अध्यात्मनिष्ठ साहित्याचा मी गंभीरपणे आस्वाद घेतला. या पुस्तकांनी आणि जीवनातील विविध अनुभवांनी मला घडविले. जीवनातील अतर्क्यतेने, गुढतेने मला खुपदा असह्य केले पण मी जीवनाच्या कुठल्याही अवस्थेत निराश झालो नाही, असे विचार त्यांनी मांडले.मुलाखतीनंतर कटरे यांनी सात संस्मरणीय कवितांचे अभिवाचन केले. यावेळी प्रा.भगवंत शोभणे आणि प्रा.विनोद मेश्राम यांनी आस्वादक प्रतिक्रिया व्यक्त केल्या. याप्रसंगी विदर्भ साहित्य संघ भंडारा शाखेच्या कार्यकारी मंडळाचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुरेश खोब्रागडे यांनी केले. तर संचालन अक्षय मासुरकर यांनी केले. आभार दा. र. प्रधान यांनी मानले. काव्यसोहळ्यासाठी प्रल्हाद सोनेवाने, प्रा.मुकुंद देशपांडे, ज्ञानेश्वर नेवारे, प्रा.करूणकुमार पिडथल, देवानंद नांदेकर, प्रमोदकुमार अणेराव, डॉ. जयश्री सातोकर, मनोज केवट, हर्षल मेश्राम, जयकृष्ण बावनकुळे, विदर्भ साहित्य संघ लाखनीचे कार्यकर्ते, समर्थ विद्यालय लाखनी येथील शिक्षक व कर्मचारी यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)