शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्याने भंगार साहित्य परत मागविले

By admin | Updated: July 24, 2016 00:32 IST

अंगणवाडीत लोखंडी कपाट व खुर्ची खरेदीसाठी थेट आंगणवाडी सेविकेच्या खात्यात निधी जमा करण्यात आली.

अफरातफर: प्रकरण अंगलट येण्याच्या भीतीने अधिकाऱ्याची सारवासारवतुमसर : अंगणवाडीत लोखंडी कपाट व खुर्ची खरेदीसाठी थेट आंगणवाडी सेविकेच्या खात्यात निधी जमा करण्यात आली. परंतु अधिकाऱ्याने दडपशाहीचा वापर करून सेविकेच्या खात्यातले पैसे काढून त्याऐवजी भंगार साहित्य पुरवठा केल्याचे उघडकीस आले. भंगार साहित्य अधिकाऱ्याने परत मागविल्याने गैरव्यवहारावर शिक्कामोर्तब झाले. त्यामुळे सदर प्रकरण अधिकाऱ्याच्या अंगलट येणार हे आता निश्चित झाले आहे.तुमसर तालुक्यातील १६५ अंगणवाडी केंद्राकरिता लोखंडी कपाट व खुर्ची खरेदीसाठी ५ हजार रुपये प्रमाणे ८ लाख २५ हजार रुपयाचा निधी हा थेट अंगणवाडी सेविकेच्या खात्यात जमा करण्यात आला. मात्र, अधिकाऱ्यांनी दबाव तंत्राचा वापर करून तुमसर येथील सीडीपीओ तथा प्रभारी खंडविकास अधिकारी मनोज हिरुडकर व पर्यवेक्षिका डायरे यांनी आंगणवाडी सेविकांना धमकावून त्यांच्या खात्यात जमा झालेले पैसे काढण्यास भाग पाडले. अशी लेखी तक्रार अंगणवाडी सेविकेची आहे. ते १६५ अंगणवाडीचे पैसे काढून या अधिकाऱ्यांनी एका कंत्राटदाराला हाताशी घेवून भंगार लोखंडी कपाट खरेदी करून प्रत्येक अंगणवाडीत ते पोहचते केले. ज्यावेळी ते कपाट उघडले असता कपाटाचे दारच अंगणवाडी सेविकेच्या हातात आले. तर कुठे कपाटाला चादरच लावलेली नव्हती. ते कपाट तर भंगारातही विकत काढले तर १०० रुपयांच्या वर कुणी पैसे द्यायला तयार होणार नाही अशीच स्थिती बऱ्याचशा अंगणवाडी व प्रत्यक्ष पाहणी दरम्यान महिला व बाल कल्याण सभापती शुभांगी राहांगडाले यांच्या निदर्शनात आल्याने प्रकरणाची खातरजमा केले. ते प्रकरण जिल्हा परिषदच्या स्थायी समितीसमोर मांडून गैरव्यवहाराचे प्रकरण चव्हाट्यावर आणले. परिणामी प्रकरणाची सावरासावर करण्याकरिता सीडीपीओ हिरुडकर यांनी अंगणवाडीत पाठविलेला भंगार लोखंडी कपाट परत मागवून घेतले. गैरव्यवहारावर अधिकाऱ्यांनीच शिक्कामोर्तब केल्याने सदर प्रकरण त्यांच्या अंगलट येणार असल्याचे बोलले जात असून अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई होणार याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. (शहर प्रतिनिधी)