शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

स्मशानात कार्यालय बांधकाम ? ग्रामपंचायत धुसाळा येथील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 14:17 IST

Bhandara : गावात चर्चेला उधाण ग्रामपंचायत प्रशासन म्हणते, जागा अजूनही निश्चित नाही

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : वर्दळीच्या असलेल्या खात रोड भागातील सिंग टॉवर या बहुमजली व्यावसायिक इमारतीमध्ये आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाययोजना न बसविणे आता या इमारत मालकाला भोवणार आहे. चौकशीत हा प्रकार लक्षात येऊनही इमारत मालकावर गुन्हा दाखल करण्यास विलंब होत होता. अखेर माध्यमांनी यावर प्रकाश टाकल्यावर बुधवारी सकाळी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली. यासंदर्भात 'लोकमत'ने २१ जानेवारीच्या अंकात वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते, हे विशेष!

१४ जानेवारीच्या घटनेनंतर पोलिस आणि पालिका अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत येथे आग प्रतिबंधक व जीव संरक्षक उपाय योजनांचा अभाव दिसून आला होता. पंचनामा करून सहा दिवसांनंतरही गुन्हा दाखल केला नव्हता. नगरपालिका कर्मचाऱ्यांनी पंचनाम्याची कागदपत्रे तक्रारीसह जोडली नसल्याने गुन्हा दाखल केला नसल्याचे पोलिस निरीक्षक गोकुळ सूर्यवंशी यांनी सांगितले होते.

दरम्यान, बुधवारी सकाळी नगर परिषदेकडून पोलिसात पंचनाम्यासह तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर वेगाने चक्रे फिरविली. पोलिसांचा ताफा सकाळी ११:३० वाजताच्या सुमारास सिंग टॉवरमध्ये पोहोचला. घटनास्थळाची पहाणी करून टॉवर मालक विरेंद्र सिंग यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १२५, २८७ आणि महाराष्ट्र अग्नी प्रतिबंधक आणि जीवन सुरक्षा उपाय अधिनियम-२००६ च्या कलम ३६ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला.

...तर घडली असती गंभीर घटना सिंग टॉवरच्या ज्या दुसऱ्या माळ्याला आग लागली, त्याच्या तिसऱ्या माळ्यावर एक खासगी कोचिंग क्लास चालतो. आग लागण्याच्या सुमारे १० ते १५ मिनिटांपूर्वीच हा क्लास सुटल्याने विद्यार्थी निघाले होते. सुदैवाने ही दुर्घटना नंतर घडली. अन्यथा जळालेल्या माळ्यावर विद्यार्थी अडकून मोठी दुर्घटना घडली असती.

बांधकाम विभागाने परवानगी दिलीच कशी ? सुमारे साडेतीन वर्षांपूर्वी ही इमारत बांधण्यात आली. बहुमजली इमारतीच्या बांधकामाला नगर परिषद परवानगी देते. व्यावसायिक वापराच्या इमारतीमध्ये फायर सेफ्टी यंत्रणा बसविली अथवा नाही, याचे प्रमाणपत्र नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाकडून घेणे आवश्यक असते. मात्र, या विभागाकडून प्रमाणपत्र न घेताच बांधकाम विभागाने येथे परवानगी दिलीच कशी? त्यासाठी कोणाचे आदेश होते? याचीही चौकशी होणे आता गरजेचे आहे. 

 

टॅग्स :bhandara-acभंडाराgram panchayatग्राम पंचायत