शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

भंडारा-नागपूर मार्गावर ट्रॅव्हल्सचा कब्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2022 22:14 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी ३० ऑक्टाेबर २०२१ पासून संप पुकारला आहे. त्यामुळे एसटी बससेवा ठप्प झाली. अलीकडे तुरळक बसफेऱ्या सुरु आहेत परंतु प्रवाशांच्या तुलनेत त्या अत्यल्प आहे. याच बाबीचा फायदा आता खासगी प्रवासी वाहतूकदारांनी घेतला आहे. संपापूर्वी एकही ट्रॅव्हल्स भंडारा- नागपूर धावताना दिसत नव्हती; परंतु आता दीड महिन्यापासून ट्रॅव्हल्सच्या संख्येत चारपटीने वाढ झाली आहे. आरटीओ कार्यालयापासून त्रिमूर्ती चाैकापर्यंत या ट्रॅव्हल्सचा ठिय्या असताे. बसस्थानकासमाेरही ट्रॅव्हल्स उभ्या असतात.

संताेष जाधवरलाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गत दाेन महिन्यांपासून एसटीचा संप सुरू असल्याचा फायदा खासगी प्रवासी वाहतूकदारांनी घेतला असून भंडारा-नागपूर मार्गाचा तर ट्रॅव्हल्स मालकांनी जणू कब्जाच घेतला आहे. दर अर्ध्या तासाला नागपूरसाठी ट्रॅव्हल्स सुटत असून आरटीओ कार्यालयापासून त्रिमूर्ती चाैकापर्यंत एकाचवेळी सात ते आठ ट्रॅव्हल्स उभ्या असतात. यामुळे राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची भीती असते.राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी ३० ऑक्टाेबर २०२१ पासून संप पुकारला आहे. त्यामुळे एसटी बससेवा ठप्प झाली. अलीकडे तुरळक बसफेऱ्या सुरु आहेत परंतु प्रवाशांच्या तुलनेत त्या अत्यल्प आहे. याच बाबीचा फायदा आता खासगी प्रवासी वाहतूकदारांनी घेतला आहे. संपापूर्वी एकही ट्रॅव्हल्स भंडारा- नागपूर धावताना दिसत नव्हती; परंतु आता दीड महिन्यापासून ट्रॅव्हल्सच्या संख्येत चारपटीने वाढ झाली आहे. आरटीओ कार्यालयापासून त्रिमूर्ती चाैकापर्यंत या ट्रॅव्हल्सचा ठिय्या असताे. बसस्थानकासमाेरही ट्रॅव्हल्स उभ्या असतात. मिनीडाेअर अथवा इतर वाहनातून प्रवासी आले की है क्या नागपूर असा आवाज देत चक्क त्यांच्याजवळील बॅगा घेऊन ट्रॅव्हल्समध्ये नेऊन ठेवतात. नाईलाज असल्याने प्रवाशांना या खासगी वाहनातून प्रवास करावा लागताे. तिकिटाचे दरही दुप्पट करण्यात आले आहेत. दाेन सीटवर तीन जण बसवून नेले जात असून काेराेना नियमांचेही उल्लंघन केले जात आहे. कुणीही प्रवासी मास्क लावलेला दिसत नाही. एवढेच काय चालक आणि एजंटही मास्क लावलेले  नसतात. त्यांच्यावर कुणाचाही निर्बंध दिसत नाही.

राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची भीती- प्रवासी मिळविण्यासाठी दिवसभर आरटीओ कार्यालय ते त्रिमूर्ती चाैकापर्यंत ट्रॅव्हल्स धारकांचा गाेंधळ सुरु असताे. शहरातून जाणाऱ्या मार्गावर माेठी गर्दी असते. नेहमी वाहतुकीची काेंडी हाेते. आता तर या ट्रॅव्हल्स कुठेही उभ्या केल्या जात असल्याने गर्दी वाढली आहे. वाहतुकीची काेंडी हाेऊन अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

थेट ट्रॅव्हल्ससाठीही गर्दी वाढली..भंडारा येथून रायपूर, गाेंदिया, पुणे, औरंगाबाद, अमरावती येथे जाणाऱ्या प्रवाशांची संख्याही माेठी आहे. एसटीच्या संपानंतर ट्रॅव्हल्समध्ये माेठी गर्दी वाढली आहे. त्रिमूर्ती चाैकात यामुळे बुकिंग काउंटरही वाढल्याचे दिसून येत आहे. याठिकाणी प्रवासी बुकिंग करुन प्रवाशाला निघतात. बुकींग सेंटरच्या समाेर रात्री ट्रॅव्हल्स उभी राहत असल्याने तेथे वाहतूकीची काेंडी हाेते.

 

टॅग्स :ST Strikeएसटी संपTrafficवाहतूक कोंडी