शहरं
Join us  
Trending Stories
1
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
2
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
3
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
4
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
5
रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
6
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!
7
VIRAL : परदेशी जोडपं फोटो काढत होतं, अचानक माकडं खांद्यावर आलं अन्... व्हिडीओ बघून खूश व्हाल!
8
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
9
निवृत्तीनंतर दरमहा मिळेल १५,००० रुपये पेन्शन, एलआयसीच्या 'या' योजनेबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
10
"एमबीबीएससाठी वेळ आणि पैसे खर्च करण्यापेक्षा मला...", अनुरागने घरातच स्वतःला संपवले, चिठ्ठीमध्ये काय?
11
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
12
२०२७ पर्यंत युनायटेड अमेरिकेचं विभाजन? ट्रम्प ठरणार USAचे शेवटचे राष्ट्राध्यक्ष! मोठे भाकित...
13
मराठी अभिनेत्रीचं "न्यूड" फोटोशूट; सौंदर्य पाहून चाहते प्रेमात, करत आहेत कौतुक
14
नवरात्री २०२५: १२५ वर्ष जुने कोकणातले पंचमुखी गायत्री मंदिर पाहिले का? मंत्रमुग्ध करणारी मूर्ती आणि इतिहास 
15
अश्विनची लवकरच क्रिकेटमध्ये नवी इनिंग; आता पाकिस्तानी क्रिकेटरसोबत एकाच संघात खेळणार!
16
पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज...
17
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
18
15 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; Volvo कार जप्त
19
Volvo EX30: एका चार्जवर ४८० किमी धावणार; वोल्वोची बहुप्रतीक्षित इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च!
20
GST कपातीचा फायदा मिळत नाहीये? टोल-फ्री नंबर किंवा व्हॉट्सअॅपवर करू शकता थेट तक्रार

ओबीसी प्रवर्गाची जातीनिहाय जनगणना करा

By admin | Updated: August 6, 2016 00:26 IST

ओबीसी प्रवर्गावर सातत्याने अन्याय होत आहे. त्यासाठी ओबीसी प्रवर्गातील सर्व नेते एकत्र आले आहेत.

सेवक वाघाये : नागपुरात ओबीसींचे महाअधिवेशनभंडारा : ओबीसी प्रवर्गावर सातत्याने अन्याय होत आहे. त्यासाठी ओबीसी प्रवर्गातील सर्व नेते एकत्र आले आहेत. त्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने ओबीसींचे महाअधिवेशन ७ आॅगस्ट रोजी नागपुरात होत आहे. या महाअधिवेशनात भंडारा जिल्ह्यातील ओबीसी प्रवर्गातील बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ओबीसी महासंघाचे कार्याध्यक्ष माजी आमदार सेवक वाघाये यांनी आयोजित पत्रपरिषदेत केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, बांधकाम सभापती विनायक बुरडे, जिल्हा परिषद सदस्य आकाश कोरे, प्यारेलाल वाघमारे हे उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले, ओबीसी प्रवर्गातील सर्व जातींची जातीनिहाय जनगणना करा, केंद्र व राज्य सरकारकडे थकीत असलेली ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची रक्कम तातडीने देण्यात यावी, उच्च शिक्षणातील ओबीसी विद्यार्थी विद्यार्थीनीना शिष्यवृत्ती द्यावे, केंद्र व राज्य सरकारच्या नोकर भरतीमध्ये, शैक्षणिक प्रवेशामध्ये असलेले २७ टक्के आरक्षण पूर्ण भरण्यात यावे, अनुशेष भरुन काढा, केवळ शासन निर्णय काढू नका, प्रत्यक्षात शासन निर्णयाप्रमाणे कृती करा, काँग्रेस सरकारने दिलेली व भाजप सरकारने रद्द केलेली तीन लाख रूपयांची राजीव गांधी फेलोशिप पूर्ववत सुरु करा, क्रिमीलेअरची मर्यादा ठरविताना होणारा अन्याय दूर करा, मर्यादा १० लाख रुपये करा, जातपडताळणी करिता ओबीसी संवर्गातीलच अधिकाऱ्यांची नेमणूक करा, ओबीसीमध्ये एससी, एसटी, एनटी अल्पसंख्याक याबद्दलचे संशयाचे वातावरण निर्माण करण्याचे शासकीय प्रयत्न ताबडतोब बंद करा, केंद्र व राज्य सरकारच्या नोकरीमध्ये विभागीय पदोन्नतीमध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीप्रमाणे ओबीसींना २७ टक्के आरक्षण लागू करावे, अशा मागण्या असल्याचे वाघाये यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)