शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
3
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
4
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
5
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
6
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
7
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
8
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
9
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
10
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
11
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
12
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
13
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
14
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
15
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
16
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
17
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
18
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
19
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
20
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन

पोषण आहारामुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

By admin | Updated: September 4, 2016 00:31 IST

तुमसर तालुक्यातील शालेय पोषण आहारात तांदूळ वगळता इतर खाद्यपदार्थ, मसाले, हळद, मिरची पुड तेलजन्य पदार्थांचा निकृष्ठ पुरवठा करण्यात आला.

तुमसर तालुक्यातील प्रकार :सुमारे १२ हजार विद्यार्थ्यांचा समावेशमोहन भोयर तुमसरतुमसर तालुक्यातील शालेय पोषण आहारात तांदूळ वगळता इतर खाद्यपदार्थ, मसाले, हळद, मिरची पुड तेलजन्य पदार्थांचा निकृष्ठ पुरवठा करण्यात आला. याप्रकरणी पंचायत समितीच्या मागील मासिक सभेत चर्चा करण्यात आली. पुन्हा ८ सप्टेंबर रोजी पंचायत समितीची मासिक सभा व ९ सप्टेंबरला वार्षिक आमसभेत हा मुद्दा गाजणार आहे. तरीही निकृष्ठ दर्जाचे पोषण आहार पुरवठा होत असल्याने विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला आहे.शालेय शिक्षण विभागाने वर्ग १ ते ८ करीता शालेय पोषण आहार सुरू केले आहे. बालकांचे आरोग्य सुदृढ रहावे त्यांना कॅरीनयुक्त प्रोटीन मिळावे याकरिता विद्यार्थ्यांना शाळेतच पोषण आहार दिला जातो. मानकाप्रमाणे त्यांना आहार देण्याचा नियम आहे, तुमसर पंचायत समिती अंतर्गत शहरी व ग्रामीण भागाकरिता शालेय पोषण आहाराचा पुरवठा केला जातो.तालुक्यात खासगी अनुदानित शाळा वर्ग १ ते ८ च्या ५३ शाळा आहेत तर जिल्हा परिषदच्या शाळा १४४ व नगरपरिषदेच्या १२ शाळा आहेत. तुमसर तालुक्यात शालेय पोषण आहाराचे लाभार्थी विद्यार्थी संख्या १२ हजार इतकी आहे.जून, जुलै २०१६ मध्ये वर्ग १ ते ५ वाटाणा ३२८२ किलोग्रॅम, मुंगदाळ ३६७८, मटकी ३४७९ किलो गरम मसाला १८६.६०० किलो, मिरची पावडर १०२६ किलो, हळद १६० किलो, मीठ १५८२.५०० किलोग्रॅम, तेल २६०१ लिटर वर्ग ६ ते ८ ला वाटाणा ३२०९ किलो, मुंगदाळ ३५२६ किलोग्रॅम, मटकी ३३३२ किलोग्रॅम, गरम मसाला ११८.४०० किलोग्रॅम, मिरची पावडर ८४९ किलोग्रॅम, हळद १६८.६०० किलोग्रॅम, मीठ १३१६ किलो, तेल २६०८ लिटर वाटप करण्यात आले.यात मिरची पावडर प्रसाद कंपनीचे, हळद संचय कंपनीचे, तेल जीआरओ रिपाईन्ड, गरम मसाला सुविधा तर मीठ व्होली आयोडाईड कंपनीचे आहे. या कंपन्या मात्र बाजारात उपलब्ध नसल्याच्या आरोप पंचायत समितीचे गटनेते हिरालाल नागपूरे यांनी केला आहे. पुरवठादाराचे देयके फक्त मागील शैक्षणिक सत्रातील मार्च २०१६ पर्यंतचे शिक्षणाधिकारी प्राथ. भंडारा यांचेकडे पावत्या व देयके तपासून पाठविण्यात आले आहेत.तांदुळ वगळता इतर सर्व खाद्य पदार्थ, मसाले, हळद, मिरचीपुड, तेलाचा दर्जा निकृष्ठ असल्याची तक्रार पं.स. चे गटनेते नागपूरे यांनी पंचायत समितीच्या मासिक सभेत केली होती. हा मुद्दा मासिक सभेत गाजला होता.विद्यार्थ्यांच्या पोषणाऐवजी त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. सुमारे १२ हजार विद्यार्थ्यांच्या जीवनाचा प्रश्न आहे. यापूर्वी शालेय पोषण आहाराचे अधिक्षकांना निवेदन दिले होते. जिल्हास्तरावर त्यांची अजुनपर्यंत दखल घेण्यात आली नाही.पोषण आहाराचा गुणवत्तेबाबत एकाही केंद्रप्रमुख किंवा मुख्याध्यापक यांची तक्रार नाही. पोषण आहाराबाबद समजोता केला जाणार नाही. तक्रारींची निश्चितच दखल घेवून कारवाई केली जाईल.- जयप्रकाश जिभकाटे, अधीक्षक, पं.स. तुमसरतांदूळ वगळता इतर खाद्य पदार्थांचा दर्जा निकृष्ठ आहे. त्याची तक्रार करण्यात आली. ८ व ९ सप्टेंबर रोजी पं.स. मासिक सभा व आमसभेत हा प्रश्न उपस्थित करू. याची तक्रार खा. नाना पटोले यांचेकडे केली आहे.- हिरालाल नागपूरे, पं.स. गटनेते तुमसर.