शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
7
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
8
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
9
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
10
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
11
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
12
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
13
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
14
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
15
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
16
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
17
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
18
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
19
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
20
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा

रासेयो शिबिर नागरिक घडविण्याची पाठशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 22:26 IST

रासेयो शिबिरातून व्यक्तीमत्व विकसित होते. वेळेचे नियोजन, तडजोड, समाजसेवा या तीन घटकांचा विकास होतो.

ठळक मुद्देरासेयो शिबिर : अजयकुमार मोहबंशी यांचे प्रतिपादन

आॅनलाईन लोकमतजवाहरनगर : रासेयो शिबिरातून व्यक्तीमत्व विकसित होते. वेळेचे नियोजन, तडजोड, समाजसेवा या तीन घटकांचा विकास होतो. श्रमदानातून श्रमप्रतिष्ठा निर्माण होते. विद्यार्थ्यांना शिस्त लावली जाऊन सुजान नागरिक घडवून राष्ट्राला हातभार लावता येतो. परिणामी रासेयो शिबिर हे सुजान नागरिक घडविण्याची पाठशाळा आहे, असे प्रतिपादन प्राचार्य अजयकुमार मोहबंशी यांनी केले.कला वाणिज्य पदवी महाविद्यालयाच्या उमरी येथील राष्ट्रीय सेवा योजना शिबिरच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सरपंच आरती रंगारी, व्यवस्थापन प्रतिनिधी डॉ. मनिष टेंभरे, पं. स. सदस्य सविता नागदेवे, मानकर, नलिनी बोरकर, नागदेवे, किर्तनकार विद्याराज कोरे महाराज, सुरेश पवार, रासेयो कार्यक्रम अधिकारी विजय गणवीर उपस्थित होते. डॉ. मनीष टेंभरे यांनी, स्पर्धेच्या काळात केवळ नोकरीच्या भरवशावर न राहता राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिरात आयोजित स्वयंरोजगार प्रशिक्षणातून मिळालेल्या कौशल्याचा वापर करून उद्योग निर्माण करा असे प्रतिपादन केले. सविता नागदेवे यांनी, बेरोजगारीवर मात करण्याची व स्वत:च्या पायावर उभे राहण्याची गावकरी व शिबिरार्थी यांना रासेयो द्वारे मिळालेली संधी असल्याच प्रतिपादन केले.किर्तनकार विद्याराज कोरे महाराज यांनी, बेरोजगारी मिटविणे आवश्यक असल्याने रोजगार निर्माण करा. हागणदारीमुक्त गाव निर्माण करावे. सर्वत्र स्वच्छता पाळावी, मंदिरासारखे गाव स्वच्छ करावे, असे प्रतिपादन केले.या सात दिवसीय शिबिरात सुरभी कला प्रशिक्षण संस्था नागपूरद्वारे संचालक संदीप देशमुख, सहकारी अंजली यांनी शिबिरामध्ये स्वयंरोजगार प्रशिक्षण दिले. यात अगरबत्ती, मेणबत्ती, धुपकांडी, फिनाईल, वॉशिंग पावडर, क्लिनिंग पावडर, स्प्रे, बांधणी, थर्माकोल आर्ट, कलर फिक्सिंग व मार्केटिंग तंत्र समजावून सांगितले. दरम्यान गावातील हनुमान मंदिर परिसरात भरण टाकल्याचे, नाल्या स्वच्छ करणे, गावातून स्वच्छता व आरोग्य विषयक मिरवणूक काढून जनजागृती करण्यात आली.