शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या २० हजार पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:36 IST

भंडारा : लाॅकडाऊनच्या सुरुवातीला कोरोनामुक्त असलेल्या भंडारा जिल्ह्यात हळूहळू कोरोना रुग्णांची संख्या वाढायला लागली. आता वर्षभरात जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची ...

भंडारा : लाॅकडाऊनच्या सुरुवातीला कोरोनामुक्त असलेल्या भंडारा जिल्ह्यात हळूहळू कोरोना रुग्णांची संख्या वाढायला लागली. आता वर्षभरात जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या २० हजार पार झाली आहे. दुसरीकडे गत चार दिवसांपासून दररोज रुग्णांचा नवा उच्चांक होत असून, शनिवारी तब्बल ८४६ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आल्या, तर चौघांचा मृत्यू झाला. प्रशासनाने आता कठोर पावले उचलली असून, रात्रीची संचारबंदीही घोषित केली आहे.

भंडारा जिल्ह्यात २७ एप्रिल रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. लाॅकडाऊन सुरू झाल्यानंतर तब्बल महिनाभराने पहिल्या कोरोना रुग्णाची नोंद भंडारा तालुक्यातील गराडा येथे करण्यात आली होती. त्यानंतरही रुग्णवाढीचा वेग अतिशय मंद होता. ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या तीन महिन्यांचा अपवाद वगळता रुग्णांची स्थिती नियंत्रणात होती. त्यानंतर जानेवारी महिन्यात तर भंडारा जिल्हा कोरोनामुक्तीच्या वाटेवर असल्याचे दिसत होते; परंतु मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून रुग्णसंख्येचा स्फोट व्हायला लागला. गत तीन दिवसांपासून तर दररोज नवनवीन उच्चांक गाठले जात आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत २० हजार १७ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यात भंडारा तालुक्यात ८६९९, मोहाडी १५७२, तुमसर २५४४, पवनी २२१४, लाखनी २११७, साकोली २०६७, लाखांदूर ८०४ रुग्णांचा समावेश आहे. यापैकी १५ हजार २८७ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली, तर ३५१ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला.

शनिवारी जिल्ह्यात ५१८४ व्यक्तींच्या घशातील स्वॅबचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यात भंडारा तालुक्यात ३५४, मोहाडी १२४, तुमसर ७९, पवनी ८८, लाखनी १०९, साकोली ७० आणि लाखांदूर २२, असे ६४६ रुग्ण आढळून आले आहेत. शनिवारी चौघांचा मृत्यू झाला असून, तीन व्यक्ती भंडारा तालुक्यातील आणि एक तुमसर तालुक्यातील आहे. भंडारा तालुक्यातील ५७ वर्षे व ५४ वर्षीय महिला आणि एका ६१ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला, तर तुमसर तालुक्यातील ६५ वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला.

बाॅक्स

४३७९ ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण

भंडारा जिल्ह्यात कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ४३७९ झाली असून, त्यात सर्वाधिक २ हजार ३ रुग्ण एकट्या भंडारा तालुक्यातील आहेत. मोहाडी तालुक्यात ३९२, तुमसर ५४५, पवनी ६२५, लाखनी ४५८, साकोली ३३६ आणि लाखांदूर तालुक्यातील १२० रुग्णांचा समावेश आहे. दररोज रुग्णांची भर पडत असून, त्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या अल्प आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयासह विविध ठिकाणी कोविड केअर सेंटरमध्ये उपचार केले जात असून, काही रुग्ण गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहेत.

बाॅक्स

मास्क न लावणाऱ्यांवर कठोर कारवाई

जिल्ह्यात कोरोना संसर्ग वेगाने वाढत असताना अनेक जण मास्कचा वापर करीत नसल्याचे दिसून येत आहे. मास्क न वापरणाऱ्यांवर आता कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहे. याबाबत त्यांनी शनिवारी एक आदेश निर्गमित केला आहे.