एका विरुद्ध तक्रार : प्रकरण डोंगरला येथील सिमेंट रस्ता बांधकामाचेतुमसर : डोंगरला येथी सिमेंट रस्ता बांधकामात निधीचा अपहार प्र्रकरणी आठ अधिकारी, कर्मचारी तथा लोकप्रतिनिधीना नरेगा खात्यात जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. त्यापैकी सात जणांनी रक्कम भरली तर ग्रामरोजगार सेवकांने रक्कम न भरल्याने त्यांच्या विरोधात अधिकाऱ्यांनी पोलिसात तक्रार दिली. अपहार करा, पैसे भरा व निर्दोश मोकळे व्हा असे दिसून येत आहे.ग्रामपंचायत डोंगरला येथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत सन २०१३-१४ मधील सिमेंट रस्ता बांधकाम प्रकरणी फेर चौकशी करण्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी त्रिसदस्यीय समिती स्थापन केली होती. त्रिसदस्यीय समितीने चौकशी अहवालात २,९४,१०८ निधीचा अपहार झाल्याचे अहवाल दिला.या रक्कमेपैकी १,४९,४८० ग्रामपंचायत डोंगरला कडून वसुल करुन नरेगाच्या खात्यात जमा करणे तसेच १,४४,६२८ निधी अहवालात नमूद शासकीय अधिकारी, कर्मचारी, कंत्राटी बांध्यस्थ मनुष्यबळ यांचकडून वसूल करुन मग्रारोहयोच्या खात्यामध्ये १५ दिवसाचे आत जमा करण्यात यावे.१५ दिवसात अपहारित रक्कम वसुल न झाल्यास संबंधीताविरुध्द गट विकास अधिकारी, तुमसर यांनी पोलिस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करावा. असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी, भंडारा यांनी दिले आहे.१,४४,६२८ रुपये स्थापत्य अभियांत्रिकी सहायक सी. यु. अत्रे, शाखा अभियंता के. टी. मरकाम, सहायक लेखा अधिकारी अविनाश रिनके, ग्रामसेवक आशा झोडे, सरपंच आशा रहांगडाले, सहायक कार्यक्रम अधिकारी पपीकांत मोरे, तांत्रिक पॅनल अधिकारी अरुण शहारे यांनी प्रत्येकी १८,०७८ रुपये नरेगाच्या खात्यात जमा केले. यापैकी ग्राम रोजगार सेवक बिंदू रत्नदीप बन्सोड यांनी १८०७८ रुपये जमा केले नाही. याविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. याप्रकरणात विधिमंडळात तारांकित प्रश्न लावण्यात आल्याचे समजते.मुदत संपल्याने खंडविकास अधिकारी मनोज हिरुडकर यांनी ग्रामरोजगार सेवक बिंदू बन्सोड यांच्या विरोधात तुमसर पोलीस ठाण्यात गुरुवारी तक्रार दाखल केली. येथे ग्रामपंचायत डोंगरला तथा सात जणांनी निधी अपहार प्रकरणी नरेगा खात्यात रक्कम जमा केली. रक्कमेची अपहार करा, शासकीय खात्यात जमा करा व निर्दोश मोकळे व्हा असे प्रथमदर्शनी दिसून येते. कायद्याच्या चौकटीत राहून येथे नियमानुसार योग्य कारवाईची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)सिमेंट रस्ता बांधकामात निधीची अपहार प्रकरणात ग्रामपंचायत, डोंगरला व इतर सात जणांनी नगरेच्या खात्यात रक्कम जमा केली. एका ग्रामरोजगार सेविकेने रक्कम जमा केली नाही. गुरुवारी त्यांच्या विरोधात तुमसर पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यासंदर्भात तक्रार देण्यात आली.- मनोज हिरुडकर, खंडविकास अधिकारी, तुमसर
अपहाराची रक्कम भरली ‘नरेगा’ खात्यात
By admin | Updated: August 6, 2016 00:24 IST