मोहन भोयर -तुमसरजंगलात एकूण प्राण्यांची संख्या किती आहे, यासाठी ट्रान्झिस्टर लाईन वन्यप्राण्यांची प्रगणना दि. २३ जानेवारीपर्यंत करण्यात येत आहे. राज्य शासनाच्या वनविभागाने तसे निर्देश देण्यात आले आहे. या पथकात बीट गार्डाचा समावेश असून वनपरिक्षेत्र अधिकारी उपवनसंरक्षकांना अहवाल सादर करणार आहेत.जंगलांची संख्या उपलब्ध आहे, परंतु त्यात वास्तव्य करणाऱ्या वन्यप्रशूंची निश्चित आकडेवारी वनविभागाकडे उपलब्ध नाही. वन्यप्राणी स्थलांतरण करतात. आता राज्य शासनाने प्रत्येक वनपरिक्षेत्रात किती वन्यप्राणी स्थलांतरण करतात. आता राज्य शासनाने प्रत्येक वनपरिक्षेत्रात किती वन्यप्राणी आहेत याची प्रगणना करण्याचे निर्देश वनअधिकाऱ्यांना दिले आहेत. दि.१५ ते २३ जानेवारी पर्यंत नऊ दिवस बिटगार्ड वन्यप्राण्यांची प्रगणना करणार आहेत. यात शाकाहारी प्राण्यांसह अन्य प्राण्यांची संख्या किती याची सविस्तर माहिती गोळा करण्यात येणार आहे. याचा अहवाल उपवनसंरक्षकांना दि. २३ जानेवारी नंतर सादर करण्यात येणार आहे. बीटगार्डावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या कार्यालयातील सर्वच कर्मचारी यात सहभागी असून संपूर्ण जंगल सध्या पालथा घातला जात आहे. दरवर्षी शासन या प्रगनेतून जंगलातील प्राण्यांची संख्या किती होती, किती वाढली, किती घटली याचा शोध घेवून त्यावर ठोस उपाययोजना करणार आहे.
आता ट्रान्झिस्टर लाईन वन्यप्राणी प्रगणना
By admin | Updated: January 18, 2015 22:39 IST