शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
6
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
7
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
8
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
9
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
10
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
11
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
12
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
13
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
14
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
15
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
16
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
17
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
18
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
19
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
20
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द

आता उरल्या ‘अस्मितादर्शकारांच्या’ आठवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 22:58 IST

‘आंबेडकरी साहित्यसृष्टी प्रज्ञाशक्तीचा अविष्कार आहे’ असे म्हणणाºया अस्मिताकार डॉ.गंगाधर पानतावने हे काळाच्या पडद्याआड गेल्याने संपूर्ण आंबेडकरी साहित्य चळवळीवर शोककळा पसरली आहे.

ठळक मुद्देआंबेडकरी साहित्य वर्तुळात शोककळा : २०१२ मध्ये भंडाऱ्यात शेवटचे व्याख्यान

आॅनलाईन लोकमतभंडारा : ‘आंबेडकरी साहित्यसृष्टी प्रज्ञाशक्तीचा अविष्कार आहे’ असे म्हणणाºया अस्मिताकार डॉ.गंगाधर पानतावने हे काळाच्या पडद्याआड गेल्याने संपूर्ण आंबेडकरी साहित्य चळवळीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने न भरून निघणारी हानी झाली असून आंबेडकरी चळवळ पोरकी झाली आहे.आंबेडकरी साहित्य व चळवळ सांस्कृतिक पुनरुत्थानाची शक्ती आहे, असे विचारसूत्र त्यांनी अस्मितादर्श रौप्य महोत्सवी मेळाव्यात मांडले होते. त्यांच्या जाण्यामुळे भंडारा येथील आंबेडकरी चळवळीत कार्य करणारे आंबेडकरी साहित्यिक अमृत बन्सोड, माया उके, सी.एम. बागडे, डॉ.धनराज भिमटे, विनोद मेश्राम यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतीगर्भ तत्त्वज्ञानातून ज्या अनेक चळवळी जन्माला आल्या आहेत. त्यात वाड:मयीन आणि सांस्कृतिक चळवळ मौलिक आहे. दास्यमुक्त आणि शोषणमुक्त माणूस आणि समाज निर्माण करण्याची विराट शक्ती ज्या आंबेडकरी तत्त्वज्ञानात आहे, त्याचेच अपत्य म्हणजे अस्मितादर्श असे डॉ.गंगाधर पानतावणे म्हणायचे.सृजनशील तथा वैचारिक आणि संशोधनपर साहित्य निर्मितीचा सशक्त मागोवा घेणाºया अनेक पिढ्या ‘अस्मितादर्श’ने घडविल्या आणि प्रथितयश नवोदित साहित्य निर्मात्यांचा संवाद निर्माण व्हावा यासाठी सन १९७४ मध्ये पहिला अस्मितादर्श लेखक-वाचक मेळावा औरंगाबाद येथे घेण्यात आला. आता या मेळाव्याचे रूपांतर साहित्य संमेलनात झाले आहे, असेही अमृत बन्सोड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.आंबेडकरवादी साहित्यकांची मोठी फळी उभारणारे अस्मितादर्शकार डॉ.गंगाधर पानतावणे यांचे भंडारा नगरीत सन २०१२ मध्ये शेवटचे व्याख्यान झाले. त्यापूर्वी ८ व ९ मे १९८१ रोजी भंडारा जिल्हा दलित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि त्यानंतर २७ व २८ डिसेंबर १९९१ रोजी भंडारा जिल्हा बौद्ध साहित्य व सांस्कृतिक मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते. त्यानंतर भंडारा येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात ३० एप्रिल व १ मे २००५ रोजी आयोजित फुले-आंबेडकरी साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून ते भंडारा येथे आले होते. या संमेलनाच्या स्वागताध्यक्ष माया उके तर सचिव अमृत बन्सोड होते. या संमेलनाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला होता. या संमेलनात त्यांनी देशात विषमता, विकृती, विघटन मोठ्या प्रमाणात आहे. विकृतीला संस्कृती, अन्यायाला न्याय या दिशेने समाजाची वहिवाट सुरु आहे. समता प्रस्थापित करण्यासाठी समाजाची पुनर्बांधणी बाबासाहेबांना करायची होती, हे झाले तर समतेवर आधारित नवी संस्कृती अस्तित्वात येईल असे प्रतिपादन डॉ.पानतावणे यांनी केले होते. आज त्यांच्या आठवणींनी आंबेडकरी साहित्य वर्तुळात शोककळा पसरली आहे.