शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

आता शेतकऱ्यांना बसणार भारनियमनाचा फटका

By admin | Updated: March 22, 2016 00:47 IST

लाखनी तालुक्यात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळाने शेती फिडरवर १६ तासाचे भारनियमन सुरु केल्यामुळे उन्हाळी धानपिक व भाजीपाल्याचे पीक वाचविणे अशक्य झाले आहे.

१६ तासांचे भारनियमन : उन्हाळी धानपीक संकटात, विद्युत कार्यालयावर शेतकऱ्यांचा हल्लाबोलसंजय साठवणे / चंदन मोटघरे साकोली / लाखनी लाखनी तालुक्यात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळाने शेती फिडरवर १६ तासाचे भारनियमन सुरु केल्यामुळे उन्हाळी धानपिक व भाजीपाल्याचे पीक वाचविणे अशक्य झाले आहे.तालुक्यातील संतप्त शेतकऱ्यांनी स्थानिक उपअभियंत्यांना मराविमंच्या कार्यालयात मोर्चा नेला. उपअभियंता आंभोरे यांच्याची चर्चा करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर शेतकरी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोहचले. त्यानंतर भारनियमन रद्द करण्यासाठी स्थानिक तहसील कार्यालयात नायब तहसीलदार अश्विनी जाधव यांना निवेदन दिले.तालुक्यातील रेंगेपार (कोठा) येथील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी संघटनाद्वारे आंदोलन करण्यात आले. रेंगेपार (कोठा) व परिसरात ५०० एकर शेतजमिनीवर धानपिकाचे उत्पादन घेतले जात आहे. तसेच भाजीपाला व इतर पिकांची लागवड केली जात आहे. यावर्षी दुष्काळग्रस्त परिस्थिती असल्यामुळे नापिकीमुळे शेतकऱ्यांना धान उत्पादन झाले नाही. त्यामुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी शेतीवरील पंपाच्या मदतीने उन्हाळी धानपिकाची लागवड केली. मात्र पीक मोठे होत असताना विद्युत वितरण विभागाने १६ तासाचे भारनियमन सुरु केल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. एक दिड महिन्यात धानाचे उत्पादन मिळेल. परंतु सध्या धानाला पाणी देणे आवश्यक आहे. विद्युत वितरण विभागाने भारनियमन सुरु केल्याने धानपिक वाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.लाखनी तालुक्यातील शेतकऱ्यांनी विद्युत विभागाला निवेदन देऊन भारनियमन रद्द न झाल्यास रास्ता रोकोचा इशारा दिला आहे. विद्युत विभाग भविष्यात पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने भूजल पातळी खोल जाऊ नये यासाठी भारनियमन करीत असल्याचे स्पष्ट केले आहे. माजी जि.प. सदस्य विजय खोब्रागडे यांनी विद्युत विभागाकडे भारनियमन रद्द करण्याची मागणी केली आहे. शेतकरी संघटनेचे रतिराम हजारे, किरण काटगाये, घनश्याम हजारे, धनंजय लोहणरे, नंदलाल काडगाये यांनी विद्युत वितरण कार्यालय व तहसील कार्यालयात भारनियमन रद्द करण्याची मागणी केली आहे. भारनियमनाच्या प्रश्नावर तालुक्यातील हजारो शेतकरी गोळा झाले होते. साकोली परिसरात १४ तासांचे भारनियमनशेतकऱ्यांनी पावसाळी पिकाचे झालेले नुकसान उन्हाळी धानपिकातून मिळेल या अपेक्षेने उन्हाळी धानपिकाची लागवड केली. मात्र धान ऐन निसवणीवर येताच साकोली, लाखनी व लाखांदूर तालुक्यात १४ तासांचे भारनियमन सुरु झाल्याने आता धानपिक कसे वाचवायचे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.यावर्षी पावसाळ्यातही पाऊस नाहीच्या बरोबर आला. त्यामुळे शेतकऱ्यांनी कसेबसे रोवणी करून पिक वाचविली. मात्र तलाव बोड्यातच पाणी नाही तर शेतकरी शेतीला पाणी तरी कुठून आणेल. अखेर पाण्याअभावी पावसाळी धानपिकाचे उत्पादन शेतकऱ्यांना मिळाले नाही. शेतकरी हवालदिल झाला. घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी करावी या चिंतेत पडला. शेवटी शेतकऱ्याला वाटले की शासन जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना न्याय देईल. मात्र शासनाने शेतकऱ्यांकडे पाठ फिरविली. त्यामुळे शेतकरी पुन्हा चिंतेत पडला.उपजिवीकेचे एकमेव स्त्रोत असलेल्या शेतकऱ्यांनी हार मानली नाही. कठाण पिकाची लागवड केली. मात्र जमिनीच सुकलेली असल्यामुळे कठाण मालही नाहीच्या बरोबर झाले. यानंतर शेवटचा यावर्षीचा प्रयोग म्हणून शेतकऱ्यांनी उन्हाळी धानपिकाची लागवड केली. शेतकऱ्यांची रोवणी आटोपली. निंदन आटोपले, औषधी प्रकरणी, खत मारणी झाली व ऐन धानपिक उमेदीवर येताच वीज वितरण कंपनीने अचानक शेतकऱ्यांना कुठलीही पूर्वसूचना न देता १४ तासाचे भारनियमन सुरु केले. त्यामुळे आता उन्हाळी धानपिक पाण्याअभावी कसे होणार असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे.अचानक सुरु झालेल्या भारनियमनामुळे शेतकरी नक्कीच अडचणीत सापडला. त्यामुळे या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी मी तत्काळ ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्याशी भेटणार आहे व सध्याही भारनियमन तत्काळ बंद करून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार. - बाळा काशिवारआमदार, साकोली.