शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

कंत्राटदाराला साडेचार कोटी दंडाची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 00:41 IST

राष्ट्रीय महामार्ग बांधकामात तुमसर व मोहाडी तालुक्यात अवैध मुरुम उत्खनन करुन भराव केल्याचे पुढे आले आहे. मुरुमाची केवळ २५०० ब्रास मंजूरी असतांना २१ हजार ८०८ ब्रास मुरुम खनन केल्याचे पुढे आल्याने महसूल प्रशासनाने संबंधित कंत्राटदाराला चार कोटी ४८ लाख १६ हजार रुपये दंडाची नोटीस पाठविली आहे.

ठळक मुद्देमुरुम : मंजुरी २५०० ब्रासची, प्रत्यक्षा उपसा २१८०८ ब्रासचा

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : राष्ट्रीय महामार्ग बांधकामात तुमसर व मोहाडी तालुक्यात अवैध मुरुम उत्खनन करुन भराव केल्याचे पुढे आले आहे. मुरुमाची केवळ २५०० ब्रास मंजूरी असतांना २१ हजार ८०८ ब्रास मुरुम खनन केल्याचे पुढे आल्याने महसूल प्रशासनाने संबंधित कंत्राटदाराला चार कोटी ४८ लाख १६ हजार रुपये दंडाची नोटीस पाठविली आहे.मन्सर-गोंदिया राज्यमार्गाला नुकताच राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्यात आला आहे. त्यानंतर लगेच रस्ता बांधकामाला सुरुवात झाली. या मार्गाच्या दोन्ही बाजूला खोदकाम करुन त्यात मुरुमाचा भराव करणे सुरु आहे. या भरावाकरिता ब्रार ब्रिक प्रोजेक्ट लिमीटेड रायपूर या कंपनीने सालई खुर्द येथील गट क्र. ३१९, १, २, ३, खनिजपट्टा एक हजार ब्रास, गट क्र. ८१५ - ३, शासकीय पट्टा एक हजार ब्रास तथा टांगा येथून ५०० ब्रास मुरुमाची लीज घेतली. तीनही लीजमधून २५०० ब्रास मुरुम नियमानुसार खनन करावयाचे होते. परंतु प्रत्यक्षात २१ हजार ८०८ ब्रास मुरुम उत्खनन करण्यात आले. तसा अहवाल सालई खुर्द च्या मंडळ अधिकाऱ्याने व मोहाडी येथील सार्वजनिक बांधकामच्या उपविभागीय अभियंत्याने मोहाडी तहसीलदारांना पाठविला. तहसीलदारांनी २१ हजार ८०८ ब्रास उत्खनन केल्याप्रकरणी ४०० रुपये प्रति ब्रास दंड असे ८७ हजार २०० रुपये व त्यावर पुन्हा पाच पट दंड असा ४ कोटी ३६ लाख १६ हजार रुपये दंडाची नोटीस पाठविली आहे. यात दोन जेसीबीवर दहा लाखांचा दंड, ट्रकवर दोन लाखांचा दंड अतिरिक्त ठोठावला आहे. दंडाची एकुण रक्कम चार कोटी ४८ लाख १६ हजार रुपये आहे. यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी ११ जानेवारीला बारब्रिक प्रोजेक्ट लिमिटेड यांना पत्र देण्यात आले होते. सदर नोटीस मध्ये १६ जानेवारी रोजी हजर राहण्याचे नमूद केले होते. सदर प्रकरणात संबंधित कंत्राटदार महसूल प्रशासनाने नव्याने गौण खनीज खननासंदर्भातील परिपत्रकाचा आधार घेण्यासाठी धडपडत आहे.