लोकमत वृत्ताची दखल : व्यावसायिकांना फलक लावण्याच्या सूचनाचुल्हाड (सिहोरा) : गुन्हेगारांचा शोध तथा बोगस सिमकार्ड धारकांवर वचक निर्माण करण्यासाठी सिहोरा परिसरातील ३० सीम कार्ड विक्रेते, मोटर सायकल विक्रेते यांना पोलिसांनी नोटीस बजाविली आहे. या संदर्भात माहिती देणे सदर्भात माथापच्ची सुरू झाली आहे.सिहोरा परिसर आंतरराज्यीय सिमेवर असून अवघ्या हाकेच्या अंतरावर नक्षलग्रस्त गोंदिया आणि बालाघाट जिल्ह्यांच्या सिमा आहे. सध्या सिम कार्ड तथा क्रमांकाचा दुरूपयोग होत आहे. एकाचा भ्रमणध्वनी क्रमांक असल्याच्या नावावर असल्याचे दिसून येत आहे. यामुळे गुन्हेगारांना शोधण्यास पोलीस विभागाला अडचणी येत आहेत.यामुळे गुन्हेगारांना शोधण्यास पोलीस विभागाला अडचणी येत आहेत. यामुळे सिहोरा पोलिसांनी परिसरातील ३० सीम कार्ड विक्रेत्यांना नोटीस बजाविली आहे. यात २ मोटर सायकल विक्रेत्याचा समावेश आहे. महिना भरात विक्री होणारे सिमकार्ड तथा अधिकृत दस्तऐवजाची साक्षांकित प्रतसह संपूर्ण माहिती ३० दिवसात पोलीस ठाण्यात देण्याच्या सुचना या नोटीसात नमूद करण्यात आलेल्या आहेत. ही माहिती गोळा करण्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आले आहे. या माहितीने निश्चितच गुन्हेगारापर्यंत पोहचण्यास पोलिसांना मदत होणार आहे. दरम्यान माहिती देण्यास हयगय करणाऱ्या सीमकार्ड विक्रेते व दूचाकीविके्रत्यावर फौजदारी कारवाई होणार असल्याने माहिती उपलब्ध करण्यासाठी माथापच्ची सुरू झाली आहे. (वार्ताहर )
३० सीमकार्ड विक्रेत्यांना नोटीस
By admin | Updated: July 24, 2015 00:41 IST