शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

महामार्ग नव्हे, हा तर मृत्यूमार्गच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 22:40 IST

लाखनी, मुरमाडी शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असल्याने अपघाताच्या घटना वेळोवेळी घडत असतात. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग हा लाखनी परिसरातील जनतेसाठी मृत्यूमार्ग बनला आहे.

ठळक मुद्देलाखनी शहरात ६३ अपघात : महामार्गावर गतीरोधकांची गरज

चंदन मोटघरे ।आॅनलाईन लोकमतलाखनी : लाखनी, मुरमाडी शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असल्याने अपघाताच्या घटना वेळोवेळी घडत असतात. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग हा लाखनी परिसरातील जनतेसाठी मृत्यूमार्ग बनला आहे. वाढते अपघाताचे प्रमाणामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे उड्डाण पुलाला मंजुरी मिळाली असली तरी प्रत्यक्षात काम सुरु व्हायला उशिर आहे. तसेच उड्डाणपुलाचे काम तीन वर्षे चालणार असल्याने वाहतुकीचे नियंत्रण करणे अशोका बिल्डकॉम कंपनी व पोलीस स्टेशन समोर मोठे आवाहन असणार आहे.मागील वर्षी सन २०१७ ला लाखनी पोलीस स्टेशन अंतर्गत मुंडीपार ते केसलवाडा (फाटा) दरम्यान एकुण ६३ अपघात झाले आहेत. एकुण अपघातापैकी २० अपघातामध्ये २० लोक जागीच मरण पावले आहेत. तसेच ४३ अपघातामध्ये गंभीर जखमी व कायमचे अपंगत्व आलेले आहेत. याबाबत जनतेच्या मनात राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस ठाणे अधिकारी व कर्मचारी यांचे बद्दल प्रचंड दोन्ही बाजूला दाट लोकवस्ती, शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालय, न्यायालय असल्याने जनतेचे महामार्ग ओलांडून जाण्याचे प्रमाण जास्त आहे.अशोका बिल्डकॉम कंपनीकडे ठाणेदार यशवंत सोलसे यांनी पत्रव्यवहार करून पेट्रोलपंप चौक, तहसील चौक, सिंधी लाईन, लाखोरी फाटा, बसस्टॉप, मानेगाव फाटा, पिंपळगाव फाटा, मुंडीपार फाटा येथे गतीरोधक तात्काळ बसविण्यात येणे आवश्यक आहे.लाखनी शहराचा आठवडी बाजार मंगळवारला भरतो. आठवडी बाजारासाठी स्वतंत्र जागा आहे. परंतु गेल्या तीन वर्षापासून अर्धेधिक आठवडी बाजार राष्ट्रीय महामार्गाच्या सर्व्हीस रोडवर भरतो व राष्ट्रीय महामार्गावर लोक वाहने उभी करत असतात. तहसील चौकापासून ते सिंधी लाईन चौक पर्यंतच्या सर्व्हीस रोडवर भाजीपाल्यांची दुकाने लागलेली असतात. राष्ट्रीय महामार्गावर मार्चनंतर उड्डाणपुलाचे काम सुरु होणार आहे. त्यामुळे आठवडी बाजार हलविणे किंवा मुळ जागेवर नेणे आवश्यक असणार आहे. यापूर्वी महामार्गावरील सर्व्हीस रोडचे आठवडी बाजाराची दुकाने हटविण्यासाठी अशोका बिल्डकॉन व पोलीस विभागाने प्रयत्न केले. परंतु त्यांना यश मिळाले नाही. भाजीविक्रेते प्रशासनाला जुमानत नसल्याने अपघाताची घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अवैध पार्किंगची समस्याराष्ट्रीय महामार्गावर मुख्य रस्त्यावर ट्रक व इतर वाहने उभी असात तर सर्व्हीस रोडवर, ट्रक, मिनीडोअर, कार, आॅटो आदींची पार्कींग केली जाते. त्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होत आहे. लाखनीच्या मुख्य बसस्थानकाजवळ, लाखोरी रोड फाटा, जयस्तंभ चौक, बाजार चौक, तहसील कार्यालयासमोरील चौका काळीपिवळी आॅटो उभे असतात. बाजार चौक व तहसील चौकातील आॅटोचालकाच्या प्रवासी वाहतुकीला जनता कंटाळली आहे. बस थांबण्याच्या जागेवर आॅटो उभे असतात. त्यामुळे अनेकदा बसला थांबण्यासाठी जागा नसते व बसवाहक गाडी पुढे नेतात. यामुळे आॅटोवाहकासाठी नियमावली असणे आवश्यक आहे.