शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

अधीक्षक नाही, वेतनच रखडले ! काय आहे शिक्षक संघटनेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 16:05 IST

शेकडो शिक्षक, कर्मचारी अडचणीत : वेतन पथक कार्यालयातील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील वेतन पथक कार्यालयात अधीक्षकांचे पद रिक्त असल्यामुळे खाजगी प्राथमिक शिक्षकांच्या वार्षिक वेतनवाढीला अडथळा निर्माण झाला आहे. शेकडो शिक्षकांचे मासिक वेतनही होऊ शकत नाही. दोन वर्षांपासून नियमित अधीक्षक नसल्याने प्रभारी अधीक्षक मनिषा गजभिये यांनी जबाबदारी सांभाळली होती, मात्र त्यांची नागपूर येथे बदली झाली आहे.

१ जुलैपासून लागू होणारी वार्षिक वेतनवाढ शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन मंजूर न झाल्यामुळे शिक्षकांचे जून महिन्याचे वेतन निर्मित होऊ शकलेले नाही. यासह अन्य विविध कामेही रखडली आहेत. आधीच विविध कारणांनी वेतन पथक कार्यालय गाजत असते. त्याचा फटका मात्र असंख्य शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना बसत आहे.

यासंदर्भात विदर्भ खाजगी प्राथमिक शिक्षक संघाने शिक्षण उपसंचालकांना पत्र देत नियमित अधीक्षक नेमण्याची मागणी केली आहे. उपशिक्षणाधिकारी हरिकिशन अंबादे यांनी निवेदन स्वीकारले. शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष दारासिंग चव्हाण, कार्यवाह प्रभाकर मेश्राम, टिंकेश लांजेवार, रामरतन केवट, रुपेश नागलवाडे आणि विलास खोब्रागडे यांनी यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. वेतन न झाल्याने शेकडो शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी अडचणीत सापडले आहेत.

काय आहे शिक्षक संघटनेची मागणीवेतन पथक कार्यालयात नियमित अधीक्षकांची नियुक्ती करावी, वेतनवाढ व वेतन देयकांच्या प्रक्रियेला सुरळीत करावे, शिक्षकांच्या आर्थिक हितासाठी त्वरित कारवाई करावी अशी मागणी शिक्षण उपसंचालकांकडे निवेदनातून केली आहे.

वेतनवाढ मंजुरीसाठी अडथळेवेतन पथक कार्यालयात अधीक्षक पद रिक्त असल्याने वार्षिक वेतनवाढ ऑनलाईन मंजूर झालेले नाही, जून महिन्यातील वेतन देयक अद्ययावत न होणे, निवड वेतनश्रेणी सुधारणा ऑनलाईन करण्यास अडचण, सेवानिवृत्त शिक्षकांचे सेवा समाप्ती ड्रॉप मंजूर न होणे, भविष्य निर्वाह निधी व वैद्यकीय प्रतिकृती देयकांचे ऑनलाईन न होणे आदी अडथळे येत आहेत.

टॅग्स :bhandara-acभंडारा