शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
3
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
4
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
5
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
6
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
7
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
8
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
9
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
10
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
11
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
12
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
13
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
14
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
15
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
16
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
17
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
18
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
19
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
20
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा

ना बसायला जागा, ना डोक्यावर छत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 05:00 IST

प्रवासी उन्हात उभे राहताहेत याकडे सर्वांचे दुर्लक्ष होत आहे. गावात पुन्हा यासाठी वर्गणी गोळा करून येथील शेड बांधायचे का, असा संतप्त सवाल विचारला जात आहे. कोरोना संकट काळात शाळा बंद होत्या; पण आज हळूहळू का होईना शाळा पूर्वपदावर येत आहेत. त्यात आता विद्यार्थ्यांची वाढती संख्या आणी उन्हाचे वाढते तापमान याकरता आता विचार होणे गरजेचे झाले आहे.

ठळक मुद्देव्यथा अड्याळ प्रवासी निवाऱ्याची : प्रवाशांचा जीव धोक्यात, धूळीचा त्रास नित्याचाच

विशाल रणदिवेलोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : भंडारा - पवनी महामार्गावरील अड्याळ येथील प्रवासी निवाऱ्याची दुर्दशा झाली आहे. ना बसायला जागा, ना डोक्यावर छत, ना सुविधा. यापूर्वी प्रवाशांना निदान उभ्या असलेल्या झाडाची तथा वर्गणी गोळा करून तयार झालेल्या मंडपाची तरी सावली मिळायची आणि त्यात कसेतरी प्रवासी उभे राहायचे; पण आज तेही उपलब्ध नाही. या ज्वलंत समस्येकडे कुणी लक्ष देणार काय, असा सवाल आहे. प्रवासी उन्हात उभे राहताहेत याकडे सर्वांचे दुर्लक्ष होत आहे. गावात पुन्हा यासाठी वर्गणी गोळा करून येथील शेड बांधायचे का, असा संतप्त सवाल विचारला जात आहे. कोरोना संकट काळात शाळा बंद होत्या; पण आज हळूहळू का होईना शाळा पूर्वपदावर येत आहेत. त्यात आता विद्यार्थ्यांची वाढती संख्या आणी उन्हाचे वाढते तापमान याकरता आता विचार होणे गरजेचे झाले आहे.आधी जे शेड होते, काही सिमेंट खुर्च्या होत्या, त्या गेल्या कुठे, हाही संशोधनाचा विषय आहे. कारण त्या खुर्च्या व शेड हे कुणी लोकप्रतिनिधी अथवा ग्रामपंचायत प्रशासनाचे नसून ग्रामस्थांनी वर्गणी गोळा करून केलेल्या पैशाने ती सर्व व्यवस्था केली होती, हेही सत्य आहे. महामार्गाच्या दोन्हीही बाजूंना जेव्हा तेथील नालीचे बांधकाम करण्यात आले. तेव्हापासून तेथील शेड व खुर्च्या कुठे गेल्या, कुठे आहेत, याचा विचार करणे आज गरजेचे झाले आहे. दिवसेंदिवस ऊन वाढत चालले आहे, याकडे आताच लक्ष दिले गेले नाही, तर वाढत्या उन्हात  याठिकाणी एकही छत नसल्याने  एखाद्या वयोवृद्ध इसमाचा तथा बालकाचा व एखाद्या विद्यार्थ्याचासुद्धा जीव धोक्यात येऊ शकतो, ही शक्यताही नाकारता येत नाही.लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती ते ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत नेहमीच अड्याळ हे गाव चर्चेत राहत असतानासुद्धा याठिकाणी प्रवाशांच्या सोयीसाठी एक साधा प्रवासी निवारा तयार करायला जर ग्रामवासी वर्गणी गोळा करून मदतीचा हात पुढे करतात, तर मग लोकप्रतिनिधी तथा लोकप्रिय नेते व राजकारणी मंडळी अशा वेळी जातात कुठे, असेही आज बोलले जात आहे.महामार्गाचे बांधकाम सुरू आहे; पण ज्या-ज्याठिकाणी कामे झालीत त्या-त्याठिकाणी दिवसातून कितीदा पाण्याचा शिडकाव होतो. ग्रामवासी तथा प्रवाशांना रोजचा किती त्रास होतो, याची जराशी तरी जाणीव आहे का कुणाला, असाही सवाल यावेळी उपस्थित केला जात आहे.

अतिक्रमण मोहिमेत काढला तात्पुरता निवारा

अड्याळ बसथांबा परिसरात आधी पक्का प्रवासी निवारा होता. अतिक्रमण हटविण्यात आले तेव्हा तोही पाडण्यात आला. त्यानंतर पक्का प्रवासी निवारा  बांधण्यात आला नाही. आज याठिकाणी रोज शेकडोंच्या संख्येने प्रवासी प्रवास करतात; पण सुरक्षितता नाही. प्रवाशांना साधे उभे राहायला, बसायला,  छतसुद्धा नाही. मग  प्रवाशांनी उन्हात राहायचे कसे, त्यात वृद्ध व बालकांना त्याचा किती त्रास होतो आहे, याची जाणीव तरी कुणाला आहे का? असेही आज बोलले जात आहे.

 

टॅग्स :state transportएसटी