शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे रुग्णालयात दाखल, प्रकृती बिघडली
2
प्रियकराने सोनमला संपविले अन् अजगर असलेल्या विहिरीत फेकले; दोन वर्षांनी पोलिसांना...
3
RBI Policy पूर्वी शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात; सेन्सेक्स १०० अंकांनी वधारला, फार्मा शेअर्समध्ये तेजी
4
६३ कोटींचा दसरा मेळावा, भाजपाचा गंभीर दावा; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका, ९ आकड्याचं गणित सांगितलं
5
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
6
"असीम मुनीर म्हणाले, तुम्ही कोट्यवधी लोकांचे जीव वाचवले"; डोनाल्ड ट्रम्प आता काय बोलले?
7
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
8
"दुबईच्या शेखला सेक्स पार्टनर हवा," बाबा चैतन्यानंदाची विद्यार्थीनींकडे अश्लील मागणी; चॅटमध्ये नेमके काय?
9
"...तर तुमची चूक माफ करणार नाही"; प्रिया मराठेच्या निधनानंतर शंतनूची पहिली पोस्ट, वाचून डोळे पाणावतील
10
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
11
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या
12
चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी
13
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
14
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
15
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
16
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
17
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
18
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
19
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
20
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!

दोन दशकांपासून शासकीय सेवेत सामावून न घेतल्याने भंडाऱ्यात प्रकल्पग्रस्त तरुणाची ‘विरूगिरी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 10:35 IST

प्रकल्पग्रस्तांतर्गत कुटुंबातील एका सदस्याला दोन दशकांचा कालावधी लोटूनही शासकीय सेवेत सामावून न घेतल्यामुळे त्रस्त झालेल्या युवकाने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील झाडावर चढून विरुगिरी केली.

ठळक मुद्देझाडावर चढून आत्मदहनाचा प्रयत्नवीस वर्षांपासून नोकरीची प्रतीक्षा

आॅनलाईन लोकमतभंडारा : प्रकल्पग्रस्तांतर्गत कुटुंबातील एका सदस्याला दोन दशकांचा कालावधी लोटूनही शासकीय सेवेत सामावून न घेतल्यामुळे त्रस्त झालेल्या युवकाने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील झाडावर चढून विरुगिरी केली. यावेळी झाडावर चढून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ४५ मिनिटांपर्यंत खळबळ उडाली होती. विनोद दागोजी ढोरे रा.सरांडी (ता.लाखांदूर) असे विरुगिरी करणाऱ्या या तरुणाचे नाव आहे.सरांडी येथील विनोद ढोरे हा उच्चशिक्षित असून त्याची वडीलोपार्जीत शेतजमीन गोसे धरणाच्या डाव्या कालव्याकरिता संपादीत करण्यात आली आहे. जनहितासाठी कार्य करताना माझा विरोध नाही, मात्र कुटुंबाच्या पालनपोषणाकरिता शासकीय नियमाप्रमाणे शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे, अशी मागणी विनोदने अनेकदा जिल्हाधिकाऱ्यांसह मुख्यमंत्र्यांनाही पाठविलेल्या निवेदनातून केली होती. विनोदचे वय वाढल्याने त्याला नोकरी मिळणे शक्य नसल्याने कुटुंबातील अन्य व्यक्तीला तरी शासकीय सेवेत सामावून घ्यावे अशी मागणीही ढोरे यांनी केली. मात्र त्यांच्या पदरी निराशाच पडली. अखेर मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मागणी पूर्ण न झाल्यास आत्मदहनाचा इशारा दिला.बुधवारी दुपारी १२.४५ च्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील कडूलिंबाच्या झाडावर चढून स्वत:वर पेट्रोल टाकले. तसेच माझ्या मागण्या तात्काळ मंजूर कराव्यात, अन्यथा येथेच आत्मदहन करणार, अशी तंबी दिली. यावेळी कार्यालयातील कर्मचाऱ्यांसह असंख्य नागरिकांनी गर्दी केली. यावेळी जिल्हाधिकारी सुहास दिवसे, जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू, एसडीपीओ संजय जोगदंड यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी झाडाभोवती गराडा घालून होते. पोलिसांचाही चोख बंदोबस्त होता.

जिल्हाधिकाऱ्यांनी काढली समजूतमी सुद्धा एक प्रकल्पग्रस्त आहे. तुमच्या भावना मी ओळखू शकतो. परंतु मागणी पूर्ण करण्यासाठी आपण अवलंबिलेला मार्ग योग्य नाही. चर्चेतूनच मार्ग निघू शकतो. यासाठी आपणाला खाली येऊन माझ्या दालनात चर्चा करावी, अशी मी ग्वाही देतो, अशी समजूत चक्क जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी विरुगिरी करणाऱ्या विनोद ढोरे याची काढली. यावेळी जिल्हाधिकारी व विनोद ढोरे यांच्यातील होत असलेली चर्चा उपस्थितांनी शांतपणे ऐकून घेतली. विनोदनेही जिल्हाधिकाऱ्यांचा मान ठेवत चर्चेसाठी तयार झाला. ४० मिनिटानंतर झाडावरून उतरल्यावर पोलिसांनी त्याला जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षापर्यंत नेले.

आश्वासन मिळालेजिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी विनोद ढोरे यांच्याशी चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी विनोदचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी त्यांनी ढोरे यांच्या रास्त मागण्या शासनापर्यंत पोहचवून त्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी विनोद ढोरे यांना दिले.

टॅग्स :Governmentसरकार