शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

जिल्हा बँकेत नोटांना ‘नो एण्ट्री’

By admin | Updated: November 12, 2016 00:32 IST

दोन दिवसांपुर्वी ५०० व १००० रूपयांच्या नोटा चलनातून रद्द झाल्या. त्यामुळे सरकारने सर्वच बॅकांना जुन्या नोटा घेण्याचे आदेश देण्यात आले.

दुसऱ्या दिवशीही रांगा : भंडाऱ्यात दोन हजारांची नोट दाखल, पाचशेच्या नोटेची उत्सुकताभंडारा : दोन दिवसांपुर्वी ५०० व १००० रूपयांच्या नोटा चलनातून रद्द झाल्या. त्यामुळे सरकारने सर्वच बॅकांना जुन्या नोटा घेण्याचे आदेश देण्यात आले. मात्र भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने या नोटा घेण्यासाठी नकार दिला. बँकेत संचालक मंडळ असते तर असा प्रकार घडला नसता, असे ग्राहकांचे म्हणने होते. प्रशासक मंडळांमुळे ग्राहकांना समाधानकारक उत्तरे मिळू शकली नाही. शुक्रवारला सकाळच्या सत्रात जिल्हा बँक उघडताच ग्राहकांनी आणलेल्या ५०० व १००० रूपयांच्या नोटा स्वीकारण्यासाठी बँकेने नकार दिला. परिणामी ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आल्यापावली परतावे लागले. सहकार क्षेत्रात शेतकऱ्यांची जिव्हाळ्याची बँक असलेल्या जिल्हा बँकेत सर्वाधिक खाते शेतकऱ्यांचे आहेत. चलनातून ५०० व १००० रूपयांच्या नोटा रद्द होताच ग्राहकांनी या बँकेतही नोटा बदलविण्यासाठी गर्दी केली. मात्र ग्राहकांच्या निराशा आली. दरम्यान, बँक कर्मचारी व ग्राहकांमध्ये हुज्जतबाजी झाली. मासळ शाखेमध्ये ५०० व १००० रूपयांचा व्यवहार बंद ठेवण्यात आल्यामुळे ग्राहकांना पैशाची अदलाबदल करता न आल्यामुळे ग्राहकांमध्ये कमालिचा असंतोष पसरला होता. (प्रतिनिधी)दोन दिवस ‘टोल फ्री’चा भंडारा जिल्ह्यातून मार्गाक्रमण होणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर दोन टोल नाके आहेत. यापैकी कारधा येथे तर दुसरे साकोली-सौंदड मार्गावर आहे. पंतप्रधानांच्या ५०० व १००० रुपयांच्या ‘नोटा’ रद्दच्या घोषणेनंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यात दोन दिवसपर्यंत नागरिकांसाठी पथकर नाका ‘टोल फ्री’ करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार ९ नोव्हेंबरच्या सायंकाळी ६ वाजतापासून नाक्यावर टोल आकारण्यात आला नाही. १० व ११ नोव्हेंबरला दोन दिवस टोल नाके बंद असले तरी त्याची भरपाई शासन करून देणार आहे. दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्गावर १४ नोव्हेंबरपर्यंत टोल माफ करण्यात येईल, अशी घोषणा केली आहे. दोन दिवसाच्या टोल बंदीमुळे लक्षावधी रूपयांची उलाढाल थांबली. १५ नोव्हेंबरपासून पुन्हा टोल आकारला जाणार आहे. शहरातील अर्धेअधिक एटीएम बंदचभंडारा शहरात सर्वच राष्ट्रीयकृत बँका व सहकारी क्षेत्रातील बँकांचे शंभरावर एटीएम आहेत. मात्र यापैकी अर्धेधिक एटीएम आज तिसऱ्या दिवशीही बंदच होते. परीणामी ‘रोख’ काढण्यासाठी नागरिकांची धावपळ झाली. शहरात सर्वाधिक एटीएम सेंटर हे स्टेट बँक, बँक आॅफ इंडिया, अ‍ॅक्सिस बँक, आयसीआसीआय, युनियन बँक, महाराष्ट्र बँक, जिल्हा बँक यासह अन्य बँकाचे एटीएम आहेत. यापैकी बहुतांश एटीएम तिसऱ्या दिवशीही बंद होते. जे एटीएम सुरू होते त्यातून केवळ एकावेळी ग्राहकाला दोन हजार रूपयांचे विड्राल करता येत होते.