शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
3
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
4
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
5
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
6
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
7
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
8
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
9
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
10
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
11
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
12
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
13
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
14
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
15
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
16
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
17
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
18
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
19
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
20
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?

ना इमारत, ना पशुधन अधिकारी ! चुल्हाडचा पशू दवाखाना गेला कुठे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 15:10 IST

राज्यस्तरीय दवाखान्याची दैनावस्था : रिक्त पदांचे ग्रहण सुटता सुटेना, वरिष्ठांचे दुर्लक्ष

रंजित चिंचखेडे लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : जनावरांना आरोग्य उपचार, लसीकरण करण्यासाठी पशू दवाखाने मंजूर करण्यात आले आहेत. पशू पालक आणि त्यांच्या पशुधनाची आम्ही किती काळजी घेतो, याचा उदोउदो करण्यात येतो. परंतु, प्रत्यक्षात पशू दवाखाना कागदावरच सुरू असल्याचा प्रकार चुल्हाड गावात दिसून आला आहे. या गावात ना इमारत, ना पशुधन अधिकारी कार्यरत आहेत. राज्य सरकारच्या अखत्यारीत असणाऱ्या पशू दवाखान्याची वाईट अवस्था झाली आहे.

जिल्हा परिषद क्षेत्र असणाऱ्या चुल्हाड गावात जनावरांचे लसीकरण आणि आरोग्याची काळजी घेण्यासाठी पशू दवाखाना मंजूर करण्यात आला आहे. शेकडोच्या संख्येत असणाऱ्या जनावरांना औषधोपचार करण्यासाठी चुल्हाड आणि देवरी देव अशी दोन गावे मिळून पशू दवाखान्याची निर्मिती करण्यात आली आहे. प्रत्यक्षात मिळणाऱ्या सेवेच्या नावाने बोंबा आहेत.

तालुक्यात हसायचे की रडायचे, अशी स्थितीराज्य सरकारच्या अखत्यारीत संचालित होणारे पशू दवाखाने ७ आहेत. ६ दवाखान्यात पशुधन अधिकाऱ्याची पदे रिक्त आहेत. हरदोली गावात असणाऱ्या एकमेव दवाखान्यात पशुधन अधिकारी कार्यरत आहेत. गत अनेक वर्षांपासून पशुधन अधिकाऱ्याची पदे रिक्त असल्याने जिल्हा प्रशासनाने अनेक अहवाल दिले असले तरी, रिक्त पदे भरण्यासाठी मुंबईत डरकाळी फोडली जात नाही. रिक्त पदांचा मोठा अनुशेष शिल्लक आहे. यामुळे तालुक्यात हसायचे की रडायचे हेच कळेनासे झाले.

जनावरांच्या लसीकरणाचा प्रश्न ऐरणीवरग्रामपंचायतीच्या जुन्या इमारतीत पशू दवाखान्याचा प्रवास सुरू होता. परंतु, पक्की इमारत मिळाली नाही. यानंतर तर उतरती कळाच लागली. जुनी इमारत कोसळल्यानंतर ग्रामपंचायतच्या व्यापारी संकुलच्या खोलीत पशू दवाखान्याचे स्थानांतरण करण्यात आले, परंतु साधे फलक लागले नाही. दोन गावांतील जनावरांचा लसीकरणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पशू पालक आणि जनावरांची किती चिंता प्रशासनाला आहे, हे यावरून दिसते.पशू दवाखाना बंद होताच खाजगी उपचाराकडे शेतकऱ्यांनी धाव घेतली आहे. जनावरांना खाजगी सेवेतून उपचार मिळायला लागले असले, तरी लसीकरण होत नाही. पशू दवाखानाअंतर्गत राबविण्यात येणारे शिबिर या दोन गावांत पोहचले नाही. चुल्हाड गावात कागदावर असणारा पशू दवाखाना किती कामाचा याचा शोध घेण्याची गरज आहे.

पशुपालक झाले त्रस्तचुल्हाड येथे पशू दवाखाना असतानाही पशुपालकांना जनावरांच्या उपचारासाठी खासगी सेवा घ्यावी लागत आहे. शासनाच्या या दवाखान्याचा उपयोग तरी काय? असा आपसूकच सवाल पशुपालक विचारीत आहेत. त्यांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे.

डॉक्टरांचे स्थानांतरणएकेकाळी या पशू दवाखान्यात सर्व सुविधा होत्या. दिमतीला पशुधन अधिकारी, पट्टी बंधक आणि परिचर होते. पशुधन अधिकारी डॉ. भैसारे यांनी अधिक सेवा दिली. ते अखेरचे पशुधन अधिकारी ठरले. डॉ. भैसारे यांचे पदोन्नतीवर स्थानांतरण झाले.

"चुल्हाड येथील पशू दवाखाना आता कागदावरच आहे. या गावाला जोडणाऱ्या गावातील जनावरांची काळजी सरकारला नाही. दवाखाना नसल्याने लसीकरण, शिबिरांच्माा यध्यमातून पशू पालकांना मार्गदर्शन प्राप्त होत नाहीत. ही समस्या सोडविली पाहिजे."- चंदा ठाकरे, सरपंच, चुल्हाड.

टॅग्स :bhandara-acभंडारा