शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्त्रायलचा एक निर्णय आणि जगाचे दोन भाग! सोमालीलँडवरून आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ
2
सत्तार म्हणाले, दानवेंनी आज पहिल्यांदा चांगले काम केले; दानवे म्हणाले, सत्तारांनी चांगले काम केल्याचे आठवत नाही!
3
मनसेला मुंबईत मोठा धक्का! प्रभारी, पदाधिकारी, शाखाध्यक्षांचा जय महाराष्ट्र; शिंदेसेनेत सामील
4
आ. विजयकुमार देशमुख यांचा असंतोष ३० तासात मावळला; मुंबईच्या बैठकीत उमेदवार निश्चित
5
Video: "पापाराझींना वाटलं सलमान खान कारमध्ये, पण...", चक्क ई-बाईकवरुन घेतली भाईजानने एन्ट्री
6
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
7
चांदी एका आठवड्यात ३२ हजारांनी महागली; तर सोन्याची ५७०० रुपयांची झेप; पाहा आजचे नवे दर
8
साप्ताहिक राशीभविष्य: २०२६ची सुरुवात दमदार, नोकरी-गुंतवणुकीत लाभ; नफा-फायदा, भरघोस भरभराट!
9
पोटात ७ टूथब्रश अन् २ लोखंडी पाने! रिपोर्ट पाहून डॉक्टरही चक्रावले; जयपूरमध्ये तरुणावर थरारक शस्त्रक्रिया
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२५: आनंदाचा दिवस; शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल!
11
प्रेमात वेडा होऊन पाकिस्तानात पोहोचला! तुरुंगवास भोगून आता अलीगडचा 'बादल बाबू' पुन्हा भारतात येणार!
12
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे? कोण मेले कोणासाठी..?
13
धुक्याचा विळखा अन् प्रवाशांचा खोळंबा! इंडिगोच्या ५७ फ्लाईट्स रद्द; DGCA कडून 'फॉग पिरियड' जाहीर
14
ये क्या था भाई? 'कमली कमली' गाण्यावर सुनिधी चौहानचा विचित्र डान्स, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
15
शाब्बास पोरी! प्रेक्षकांच्या लाडक्या इंदूने घेतलं हक्काचं घर, कांची शिंदेंने शेअर केले फोटो
16
‘केडीएमसी महापालिकेत ‘ब्रँड’वाल्यांचा बँड वाजवा’; ठाकरे बंधूंचे नाव न घेता शिंदे यांची टीका
17
उमेदवाराची शिफारस करणाऱ्या एमआयएम पदाधिकाऱ्यांना द्यावी लागणार लिखित हमी, जलील यांनी घेतल्या इच्छुकांच्या मुलाखती
18
काँग्रेसचे ५ जानेवारीपासून ‘मनरेगा बचाव’ आंदोलन, मल्लिकार्जुन खरगे यांची घोषणा
19
केवळ १२ जागांवरून ठाण्यात अडली भाजप-शिंदेसेनेची चर्चा; तिसरीही बैठक निर्णयाविना; आज फैसला होण्याची शक्यता
20
आयुक्तांना विकले चक्क ११०० रुपयांना पूजेचे ताट! वेशांतरामुळे उघड झाला शनैश्वर देवस्थानातील प्रकार 
Daily Top 2Weekly Top 5

ना कारवाई, ना दंड

By admin | Updated: October 29, 2015 01:06 IST

‘स्वच्छ भारत अभियाना’तंर्गत उघड्यावर शौचाला जाण्यासाठी प्रतिबंध घालण्यात आला आहे.

आरोग्य धोक्यात : उघड्यावर शौच सुरूच, आधुनिक तांत्रिक माध्यमाची सुरूवात कधी?भंडारा : ‘स्वच्छ भारत अभियाना’तंर्गत उघड्यावर शौचाला जाण्यासाठी प्रतिबंध घालण्यात आला आहे. पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावर ‘गुड मॉर्निंग दल’ स्थापन करून त्यांची गस्त घालण्याचे आणि संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. परंतु, या अभियानाला अनेक महिने लोटले तरी कुठेही कोणती कारवाई झालेली नाही, ना कुणालाही दंड झाला नाही. त्यामुळे हे अभियान प्रसिद्धीचा स्टंट झाला आहे.उघड्यावर शौच केल्यामुळे अनेक आजारांचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे जनतेच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतात. त्यामुळेच स्वच्छतेचे महत्व ओळखून सर्वत्र स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे. त्याअंतर्गत उघड्यावर शौच करणाऱ्यांविरुद्ध पोलीस कारवाई होणार आहे. याबाबत विभागीय आयुक्तांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना आदेश जारी केले आहेत. गृहविभागाने पोलीस यंत्रणेचे सहकार्य घेण्यासाठी १२ आॅगस्ट २००८ च्या परिपत्रकाचा उपयोग करून मुंबई पोलीस अधिनियमाअंतर्गत फौजदारी कारवाईचे निर्देशही दिले आहेत. परंतु प्रत्यक्षात कारवाई होताना दिसत नाही. ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम ४९ अंतर्गत ग्रामपंचायतचे कार्य चालविण्यासाठी विविध ग्राम विकास समितीचे गठन केले जाते. यात गावातील गणमान्य व्यक्तीचा समावेश असेल. समितीच्या सदस्यांना शौचालय उपयोगाचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. ग्रामपंचायत व पंचायत समितीस्तरावर गस्त घालण्याचे आदेशात म्हटले आहे. मात्र अशी गस्त कुठेही दिसत नाही. ग्रामीण क्षेत्रातील युवा वर्ग मोठ्या प्रमाणात स्मार्ट फोनचा उपयोग करीत आहेत. जिल्हास्तरावर स्वच्छ भारत मिशनच्यावतीने वॉटस्अ‍ॅपसारखे अ‍ॅप तयार करून स्वच्छतेसंबंधी माहिती देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. घाण पसरविणाऱ्यांवर काय कारवाई केली जाऊ शकते, याची माहिती आधुनिक तांत्रिक माध्यमाने देण्यात येणार आहे. (नगर प्रतिनिधी)स्वच्छताविषयक जनजागृतीकडे दुर्लक्षस्वच्छतेबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे. मात्र जनजागृतीकडे दुर्लक्ष करून ग्रामीण भागात उघड्यावर शौच केले जात आहे. त्यामुळे लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अनेकदा रस्त्यावर चालणेसुद्धा कठिण होऊन जाते. अशाप्रकारे घाण पसरविणाऱ्या व्यक्तीविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी, अधिकारी व ग्रामसेवकांनी विनंती केल्यावर पोलिसांकडून कारवाईसाठी सहकार्य केले जाते.ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारेभंडारा शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे साचलेले दिसून येतात. त्यावर मोकाट जनावरे चरतात. पॉलिथीन बॅगमध्ये लोक काही खाण्याच्या वस्तू, शिळे अन्न कचऱ्यात फेकतात. मोकाट जनावरे ते पदार्थ खाताना सोबत पॉलिथीन बॅगही खाऊन टाकतात. त्यामुळे त्यांच्या पोटात प्लॅस्टिक जमून काही दिवसांनी त्यांचे पोट फुगते. त्यातूनच जनावरांवर जीव गमवावा लागतो. पण त्याबाबत पालिका प्रशासन काहीही कार्यवाही करीत नाही.