शहरं
Join us  
Trending Stories
1
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
2
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
4
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
5
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
6
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
7
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
8
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
9
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
10
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
11
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
12
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
13
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
14
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
15
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
16
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
17
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
19
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
20
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल

वन्यप्राणी मानवी संघर्षात नऊ जणांचा बळी

By admin | Updated: October 29, 2014 22:43 IST

भंडारा वन विभागांतर्गत जिल्ह्यातील विविध वनपरिक्षेत्रात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात शेतपिकांसह पशुधन व मानवहानी झालेल्या आहेत. मानव वन्यप्राणी संघर्षात पाच वर्षात नऊ व्यक्तींचा बळी

पाच वर्षांत तीन कोटींची नुकसान भरपाई : १२७ मनुष्य जखमी, ३५१ पाळीव जनावरे फस्तप्रशांत देसाई - भंडाराभंडारा वन विभागांतर्गत जिल्ह्यातील विविध वनपरिक्षेत्रात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात शेतपिकांसह पशुधन व मानवहानी झालेल्या आहेत. मानव वन्यप्राणी संघर्षात पाच वर्षात नऊ व्यक्तींचा बळी तर १२७ व्यक्ती जखमी, ३५१ पशुधन ठार तर ३,१०२ शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे. पाच वर्षात नुकसानीपोटी भंडारा वनविभागाने ३५८९ प्रकरणात २ कोटी ९१ लाख ६ हजार ७०० रूपयांचे नुकसान भरपाई वाटप केले आहे. एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यात वन्यप्राण्यांनी केलेल्या शेतपिकांच्या नुकसान भरपाईचे ६१८ प्रकरण वनविभागाकडे आले. त्यात ३३ लाख ४५ हजार ४५ रूपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे. वन्यप्राण्यांनी पशुधनावर हल्ला करून ४१ पाळीव जनावरांचा बळी घेतला आहे. त्या मोबदल्यात २ लाख ५७ हजार ४०५ रूपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे. वन्यप्राण्यांनी मनुष्यांवर हल्ला करून २७ व्यक्तींना जखमी केल्याच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी वनविभागाने ३ लाख २८ हजार ५७५ रूपयांची भरपाई संबंधीतांच्या नातेवाईकांना करण्यात आली आहे. सहा महिन्यात ६८६ प्रकरणांसाठी वन विभागाने ३९ लाख ३१ हजार २५ रूपयांचे नुकसान वाटप केले आहे.सन २०१०-११ पासून सप्टेंबर २०१४ या पाच वर्षाच्या दरम्यान वन्य प्राण्यांनी मोठ्या प्रमाणात शेतपिक, पशुधन व मानवहानी केली आहे. भंडारा वन विभागात ३ हजार ५८९ प्रकरणांची नोंद करण्यात आलेली आहेत. त्यातील नुकसानग्रस्तांना २ कोटी ९१ लााख ६ हजार ७०० रूपयांचे वाटप करण्यात आले आहे. यात शेतपिकांच्या नुकसानीपोटी १ कोटी ४१ लाख ८२ हजार ६२५ रूपये, पशुधनाच्या नुकसानीसाठी २४ लाख ९३५ रूपये, जखमी मनुष्यांना २२ लाख ३३ हजार १४० रूपये तर ठार झालेल्या नऊ व्यक्तींच्या कुटूंबियांना २१ लाखांचे वाटप करण्यात आले आहे. २०१०-११ मध्ये वन्यप्राण्यांनी ८१ शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे नुकसान केले, ७७ पशुधन ठार, २७ व्यक्ती जखमी तर दोघांचा बळी घेतला. वनविभागने १८७ प्रकरणात १६ लाख ९१ हजार ६८४ रूपयांचे नुकसान भरपाई वाटप केली. २०११-१२ मध्ये शेतपिकांची २२५ प्रकरणे, ९६ पशुधन ठार, ४३ व्यक्ती जखमी तर तिघांचा मृत्यू झाला. ३६७ प्रकरणात वनविभागाने २७ लाख ६ हजार ८४७ रूपयांचे नुकसान भरपाई वाटप केले. सन २०१२-१३ मध्ये ७८६ शेतपिकांची नुकसानीसंबंधी प्रकरणे, ६४ पशुधन ठार, १६ व्यक्ती जखमी तर तिघांचा बळी वन्यप्राण्यांनी घेतला. या ८६९ प्रकरणात ४८ लाख २७ हजार ९५२ रूपयांचे नुकसान भरपाई वाटप करण्यात आले. २०१३-१४ मध्ये वन्यप्राण्यांनी १ हजार ३९२ शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे नुकसान केले. ७३ पशुधन ठार, १४ व्यक्ती जखमी तर एकाचा बळी घेतला. १ हजार ४८० प्रकरणात वनविभागने ७७ लाख ५९ हजार १९२ रूपयांची मदत दिली आहे.