आॅनलाईन लोकमतभंडारा : होळीच्या पर्वावर दारूची तस्करी करणाऱ्या वाहनाला पकडून ९ लाख २ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने केली. या प्रकरणातील आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.स्कॉर्पिओ (एम.एच. ३६ - एच. २३९०) या वाहनाला पथकाने थांबविण्याचा प्रयत्न केला असता वाहनचालकाने धूम ठोकली. त्यामुळे या वाहनाचा पाठलाग करून वाहन थांबविले असता वाहन सोडून चालक फरार झाला. वाहनाची झाडाझडती घेतली असता ७० पेट्यात देशी दारूच्या ७ हजार सिलबंद बाटल्या व वाहन असा ९ लाख २ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.पवनी तालुक्याला दारूबंदी चंद्रपूर जिल्ह्याची सीमा लागून आहे. त्यामुळे देशी दारूचा हा साठा चंद्रपूर जिल्ह्यात नेण्यात येत असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
दारू सह नऊ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 22:44 IST