शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकट; KL राहुलनं एक कॅच सोडला
4
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
5
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
6
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
7
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
8
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
9
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
10
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
11
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
12
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
13
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
14
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
15
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
16
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
17
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
18
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
19
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल

भंडाऱ्यात आढळली ‘सुरण’ची नवी प्रजाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 00:22 IST

वनसंपदा व जैवविविधतेने नटलेल्या भंडारा जिल्ह्यात पुन्हा एक नवीन संशोधन समोर आले आहे.

तरूणतुर्क संशोधकांची कामगिरी : आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकेत स्थानलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : वनसंपदा व जैवविविधतेने नटलेल्या भंडारा जिल्ह्यात पुन्हा एक नवीन संशोधन समोर आले आहे. तरूणतुर्क संशोधकांनी यावेळी सुरणच्या नवीन प्रजातीचा शोध लावला असून ती वनस्पती नव्याने अस्त्तिवात आलेल्या कोका अभयारण्य आढळली आहे. पूर्व विदर्भातील भंडारा जिल्हा वनसंपदा व जैवविविधतेच्या बाबतीत समृद्धतेने नटलेला भूभाग. यात कोका अभयारण्य म्हणजे वन्यजीव वास्तव्य आणि आुर्यवैदिक औषधींची खाण आहे. कोका अभयारण्यात भ्रमंती करीत संशोधक तथा अभ्यासक डॉ. जगन्नाथ गडपायले, प्रा. सुभाष सोमकुवर आणि डॉ. अलका चतुवेर्दी या वनस्पती शास्त्रज्ञांनी ‘सुरण’ जातीच्या वनस्पतीची नवीन प्रजाती शोधून काढली आहे. विशेष म्हणजे त्याला जागतिक वनस्पतीतज्ज्ञांनीही मान्यता दिली आहे. प्राध्यापकांच्या या संशोधनामुळे? पूर्व विदर्भाच्या शिरपेचात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला आहे.सुरण या वनस्पतीच्या नव्या प्रजातीचा शोध लावणारे डॉ. जगन्नाथ गडपायले हे तुमसर येथील एस. एन. मोर महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. प्रा. सुभाष सोमकुवर हे नागपुरातील दीक्षाभूमीतील डॉ. आंबेडकर महाविद्यालयात तर डॉ. अलका चतुवेर्दी ह्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागात कार्यरत आहेत. या संशोधक प्राध्यापकांनी सुरण वनस्पतीचा नमुना गोळा केले. तिच्या विविध भागांचे सूक्ष्म वर्णन, बाह्य अंगाचे, पृष्ठभाग, फुले, बिया व कंदमूळ आदी भागांचे २०१२ ते २०१६ या चार वर्षांत सूक्ष्म निरीक्षण व अभ्यास केला. निरिक्षणाअंती ‘इंटरनॅशनल कोड आॅफ बॉटनिकल नॉमेनक्लेचर’नुसार वनस्पती शास्त्रीय वर्णन करून ‘‘अ‍ॅमारफोफॉलस श्यामसलिलीयनम गडपायले, सोमकुवर व चतुवेर्दी’’, असे नामकरण केले. आहे. ‘अरेशी’ या कुटुंबामध्ये या प्रजातीचे कूळ आहे.सन २०१२ मध्ये भंडारा तालुक्यातील पलाडी या गावानजीकच्या कोका अभयारण्यातील जंगल भागात डॉ. गडपायले व प्रा. सोमकुवर यांना या वनस्पतीचे वास्तव्य आढळले होते. अभयारण्याच्या या भागात वाघ, बिबट व इतर वन्यजीव प्राण्यांचेसुद्धा वास्तव्य आहे. अभ्यास करताना सौदी अरेबिया येथील किंग साउड विद्यापीठ रियोध येथील प्रख्यात वनस्पतीतज्ज्ञ डॉ. एम. शिवदासन, फिनलॅण्ड येथील हर्ब्यारिअम कुरेटर युनिव्हर्सिटी आॅफ तुर्क, एस. एन. मोर कॉलेजचे प्राचार्य डॉ. सी. बी. मसराम व नागपुरातील डॉ. आंबेडकर इन्स्टिट्युट आॅफ मॅनेजमेंट स्टडीज अ‍ॅण्ड रिसर्चचे संचालक डॉ. सुधीर फुलझेले यांचे त्यांना पूर्णपणे सहकार्य लाभले. संशोधनाबाबत गोंदिया शिक्षण संस्थेचे राजेंद्र जैन, प्राचार्य डॉ. सी. बी. मसराम, डॉ. आंबेडकर इन्स्टिट्युट आॅफ मॅनेजमेंट स्टडीज अ‍ॅण्ड रिसर्चचे संचालक डॉ. सुधीर फुलझेले यांनी संशोधकांचे कौतुक केले आहे. प्राध्यापकांच्या नावावर वनस्पतीचे नाव वनस्पतीच्या नामकरणाच्या निकषानुसार या वनस्पतीला भंडारा येथील जे. एम. पटेल कॉलेजचे प्रा. श्याम डफरे व प्रा. सलील बोरकर यांना या वनस्पतीचे नाव समर्पित करण्यात आले आहे. सुरण वनस्पतीच्या नव्या प्रजातीच्या संशोधन कायार्चा शोधप्रबंध डॉ. गडपायले यांनी २०१५ मध्ये केरळमधील कालिकत विद्यापीठाच्या पदव्युत्तर वनस्पतीशास्त्र विभागातर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत सादर केला. हा शोधप्रबंध आॅकलॅण्ड, न्युझीलंड, मॅगनोलिया प्रकाशनाच्या फायटोटेक्सा या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झाला. सुरण वनस्पतीचा अभ्यास करणारे आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ श्यामुलीन लेहटोनन यांनीही या नव्या प्रजातीला मान्यता दिली आहे. सदर नमुना बॉटनीकल सर्व्हे आॅफ इंडिया, कोलकाता येथे पाठविण्यात आले आहे.वनस्पतीची वैशिष्ट्येसुरण वनस्पतीच्या मुळांपेक्षा या नवीन प्रजातीची सहमुळे वेगळी आहेत. देठावरील खुणा, तसेच फुलाच्या कोंबावरील तुराही वेगळा आहे. वनस्पतीशास्त्रानुसार रायझोमॅट्स आॅफसेट, स्टॅमिनोडल फ्लॉवर्स, प्रोट्रुडिंग डार्क पर्पलीश टू ब्रॉउशनीश अपेंडिक्स (जांभळी ते तपकीरी रंगाची अपेंडिक्स) अश आहे. सदर नवीन प्रजाती खाण्या योग्य आहे की नाही, याबाबतही भविष्यात संशोधन केले जाणार आहे.