शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई कोटा कमी करण्यासाठी नवी शक्कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2022 05:00 IST

देशात २०१२ पासून शिक्षण हक्क कायदा लागू करण्यात आला. यानुसार इंग्रजी माध्यमांच्या शाळेत २५ टक्के मुलांना मोफत शिक्षणाची सोय करण्यात आली. गरिबांच्या मुलांना हक्काचे व दर्जेदार शिक्षण मिळावे हा यामागचा उद्देश आहे; परंतु शासनाच्या ढिसाळ नियोजनाने खरे गरीब विद्यार्थी शिक्षणापासून दूर आहेत. प्रवेशाची नियमावली सोयीनुसार बदलल्याने गरिबांसाठी असलेले शिक्षण नावापुरते उरले आहे.

तथागत मेश्रामलोकमत न्यूज नेटवर्कवरठी : चार वर्षांपासून प्रतिपूर्ती रक्कम शासनाने अडवून ठेवली आहे. दरवर्षी प्रतिपूर्तीता ठरावीक दर कमी करून संस्थाचालकांच्या पैशावर डल्ला मारणे सुरू आहे. आता शासनाने गरिबांच्या हक्कांच्या शिक्षणावर डल्ला मारण्याचा घाट घातला आहे. आरटीई प्रवेशाच्या अधिकृत प्रचलित पद्धतीत बगल देऊन २५ टक्क्यांतर्गत प्रवेशाचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे आरईटीच्या जागा कमी होऊन शेकडो विद्यार्थ्यांना हक्काच्या शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ येणार आहे.देशात २०१२ पासून शिक्षण हक्क कायदा लागू करण्यात आला. यानुसार इंग्रजी माध्यमांच्या शाळेत २५ टक्के मुलांना मोफत शिक्षणाची सोय करण्यात आली. गरिबांच्या मुलांना हक्काचे व दर्जेदार शिक्षण मिळावे हा यामागचा उद्देश आहे; परंतु शासनाच्या ढिसाळ नियोजनाने खरे गरीब विद्यार्थी शिक्षणापासून दूर आहेत. प्रवेशाची नियमावली सोयीनुसार बदलल्याने गरिबांसाठी असलेले शिक्षण नावापुरते उरले आहे. शासनस्तरावर आरटीई प्रवेशावर कात्री लावल्याने पालकवर्गात नाराजीचा सूर उमटत आहे.  आरटीईअंतर्गत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा खर्च म्हणून प्रतिपूर्ती देण्यात येते. यात केंद्र व राज्य सरकारचा वाटा आहे. प्रतिपूर्ती रकमेत मोठा वाटा केंद्र सरकारचा असून राज्य नाममात्र भार उचलतो. प्रतिपूर्ती देण्यास राज्य शासन टाळाटाळ करीत असल्याचा आरोप आहे.

प्रवेशाचे धोरण निश्चित नसल्याने घोळ- आरटीईअंतर्गत पहिल्या वर्गातील एकूण प्रवेश क्षमतेच्या २५ टक्के मुलांना प्रवेश देण्याची प्रचलित पद्धत आहे. शासनाने प्रवेश प्रक्रियेसाठी ध्येय धोरण निश्चित केले नसल्याने सुरुवातीपासूनच घोळ आहे. नामांकित इंग्रजी शाळा या नियमानुसार प्रवेश देत नाही. त्यामुळे शासनाने दोन वर्षांपूर्वी बदल करून गतवर्षी झालेल्या एकूण प्रवेशाच्या २५ टक्के विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे धोरण आखले.- प्रचलित पद्धतीनुसार प्रवेश कोटा न ठरविता एकूण प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांपैकी २५ टक्के प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या वजा करून कोटा ठरविण्यात आला. त्यासाठी तीन वर्षांची सरासरी काढून कोटा ठरविण्यात आला. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात जागा कमी झाल्याने शेकडो विद्यार्थी शिक्षणाच्या हक्कापासून वंचित राहिले.

शिक्षण विभाग अनिभज्ञ- भंडारा जिल्ह्यातील इंग्रजी माध्यम शाळांची आरटीई प्रतिपुर्ती प्रलंबित आहे. याबाबत मागणी बिल सादर करण्याची जबाबदारी शिक्षण विभागाची आहे. मात्र शिक्षण विभागाने मागणी बिलच सादर केले नाही. त्यामुळे जिल्ह्याला कवडीमोल प्रतिपुर्ती मिळाल्याचा आरोप इंग्रजी माध्यम संस्थाचालकांनी केला आहे. दोन महिन्यांपासुन शिक्षण विभागाकडे पैसे पडुन असतानाही वाटपाच्या कोणत्याच हालचाली होत नाही. त्यामुळे शिक्षण संस्थाचालकांत रोष आहे.

 

टॅग्स :Educationशिक्षण