शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात नवी आर्थिक क्रांती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 23:32 IST

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी उभारी देणारी ठरणार आहे. या योजनेचा लाभ दुर्गम भागातील गरीब नागरीक, शेतकऱ्यांना होणार आहे. बँक सेवेपासून वंचित नागरीकांपर्यंत इंडिया पोस्ट पेमेंटस बँक पोहोचणार असल्यामुळे दैनंदिन आर्थिक व्यवहार कमीत कमी वेळेत होण्यास मदत होईल. मोबाईल फोनच्या माध्यमातून पोस्ट आॅफिस आपल्या दारी येणार असल्यामुळे सामान्य माणसांना मोठा दिलासा मिळणार आहे. ही योजना म्हणजे ग्रामीण भागातील नविन आर्थिक क्रांती ठरेल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

ठळक मुद्देचंद्रशेखर बावनकुळे : भंडारा येथे इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक शाखेचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी उभारी देणारी ठरणार आहे. या योजनेचा लाभ दुर्गम भागातील गरीब नागरीक, शेतकऱ्यांना होणार आहे. बँक सेवेपासून वंचित नागरीकांपर्यंत इंडिया पोस्ट पेमेंटस बँक पोहोचणार असल्यामुळे दैनंदिन आर्थिक व्यवहार कमीत कमी वेळेत होण्यास मदत होईल. मोबाईल फोनच्या माध्यमातून पोस्ट आॅफिस आपल्या दारी येणार असल्यामुळे सामान्य माणसांना मोठा दिलासा मिळणार आहे. ही योजना म्हणजे ग्रामीण भागातील नविन आर्थिक क्रांती ठरेल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.भारतीय टपाल विभागाअंतर्गत इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (आयपीपीबी) देशभरातील ६५० शाखा आणि ३२५० अस्सेस पॉइंट शाखांचा उद्घाटन सोहळा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तालकटोरा स्टेडीयम, नवी दिल्ली येथून करण्यात आले.पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत लक्ष्मी सभागृह भंडारा येथे शनिवारला हा उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी खासदार मधुकर कुकडे, आमदार अ‍ॅड. रामचंद्र आवसरे, वरिष्ठ अधीक्षक डी.ए. साळवे, सहाय्यक अधिक्षक प्रभातकुमार सिन्हा, इंडिया पोस्ट पेमेंटस बँक भंडारा शाखा व्यवस्थापक वैभव बालकुंडे, पोस्टमास्टर ए.के. भलावी उपस्थित होते. भंडारा येथे पालकमंत्री बानकुळे यांनी इंडिया पोस्ट पेमेंट बँक शाखेचे उदघाटनही केले. यावेळी त्यांच्या हस्ते खातेदारांना 'क्युआर कार्ड' वाटप करण्यात आले.यावेळी खासदार मधुकर कुकडे यांनी या योजनेची प्रशंसा केली. पोस्टाने क्रांतीच्या दिशेने पाऊल टाकले असे ते म्हणाले. इंडिया पोस्ट पेमेंटस बँकेच्या माध्यमातून डाक विभाग आता लोकांच्या अनेक प्रकारच्या सेवा सुविधा उपलब्ध करून देणार आहे. इंडिया पोस्ट पेमेंटस बँकेच्या खातेदारांना आता रक्कम काढण्यासाठी किंवा जमा करण्यासाठी डाकघरापर्यंत येण्याची आवश्यकता भासणार नाही. पोस्टमन स्वत: त्याच्याकडे असलेल्या मोबाईल डिवाईसच्या माध्यमातून ही सेवा उपलब्ध करुन देतील.विविध सेवांच्या पेमेंटसाठी खासगी संस्थांचे अनेक कार्ड उपलब्ध आहेत. आता भारतीय डाक विभागाने इंडिया पोस्ट पेमेंट बॅकेच्या माध्यमातून क्युआर कार्ड आणले आहे. या कार्डच्या माध्यमातून विजेचे बिल, मोबाईल बिल, डीटीएच रिचार्ज, गॅस व विमा हप्ता आदींचे बिल अदा करता येईल. खातेधारक या कार्डला आपल्या बचत खात्याशी लिंक करु शकतात. संचालन शिल्पा खंडाईत यांनी केले.