शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

भंडाऱ्यातील नेरलावासी पुनर्वसनासाठी उतरले रस्त्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2024 13:47 IST

लिखित आश्वासन : गोसीखुर्द पुनर्वसन विभागाने घेतली दखल

विशाल रणदिवेलोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : घरांचे मोजमाप करून मोबदला देण्यात यावा, गावठाणाची जागा निश्चित करण्यात यावी, या मुख्य मागणीसाठी नेरला येथे शुक्रवारला नेरलावासीयांनी गांधी चौकात रास्ता रोको आंदोलन केले. ग्रामस्थांच्या आंदोलनाचा धसका घेत प्रशासनातर्फे गोसीखुर्द पुनर्वसन विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी आंदोलनस्थळी रिमझिम पावसातच मागण्यांच्या पूर्ततेसंदर्भात लिखित स्वरूपात आश्वासन दिले.

नेरला येथील पुनर्वसनाचा प्रश्न फार जुना आहे. आज उद्या करीत प्रशासनाने चालढकलपणा केल्याचा आरोप यापूर्वीच ग्रामस्थांनी केला होता. आता आंदोलनाशिवाय मार्ग नाही असे म्हणत ग्रामवासीयांनी ५ जुलै रोजी आंदोलनाचे बिगुल फुंकले होते. आठ महिन्यांपूर्वी घराचे मोजमाप सुरू झाले असताना अचानक बंद झाले. मागण्या पूर्ण होत असल्याचा आनंदही ग्रामस्थांनी व्यक्त केला. पण हा आनंद औटघटकेचा ठरला होता. त्यानंतर फक्त आश्वासनाखेरीज काहीच मिळाले नाही.

शुक्रवारला नेरला येथील महात्मा गांधी चौकातून आंदोलनाची सुरुवात झाली. या आंदोलनाला वरुणराजानेही हजेरी लावली. पावसातही ग्रामवासी जागचे हलले नाहीत. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत जागचे हलणार नाही, असा पवित्रा घेतला. रास्ता रोको आंदोलन तीव्र होताच कार्यकारी अभियंता आंदोलनस्थळी पोहोचले. तसेच मागण्यांबाबत लिखित आश्वासन दिले. आश्वासन देताच ग्रामस्थांनी टाळ्यांच्या गजर केला.

यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. उपस्थित अधिकारी पोलिस अधिकारी कर्मचारी यांचेही आंदोलनकर्त्यांनी आभार मानले. आता घरांच्या मोजणीला ब्रेक लागणार नाही अशीही ग्वाही यावेळी आंदोलनकर्त्यांना कार्यकारी अभियंता यांनी दिली. यावेळी कार्यकारी अभियंता (गोसीखुर्द पुनर्वसन विभागीय पथक नागपूर) राजेश सोनवणे, उपविभागीय अधिकारी रमेश पिंपळकर, ठाणेदार धनंजय पाटील, पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

काय दिले आश्वासन?घरांचे किंवा खुल्या जागेचे मोजमाप प्रक्रिया सुरू झालेली असून ती शेवटपर्यंत थांबणार नाही. यासाठी सहा अभियंता व कर्मचारी नियमित काम करणार आहेत, मौजा नेरल्याच्या पर्याय गावठाण अड्याळ येथे मूळ मंजुरीतील ७४३ कुटुंबांकरिता ८० हेक्टर आर जागा उपलब्ध आहे. परंतु सध्या स्थितीत कुटुंब संख्या १,२३६ प्रमाणित झाल्यामुळे वाढीव कुटुंबाच्या दृष्टीने अतिरिक्त्त ४० हेक्टर आर जागेच्या मंजुरीची कारवाई लवकरच करण्यात येईल. तसेच प्रकल्प बाधित कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देणे, कुटुंबीयांचे नाव अंत्योदय यादीत समाविष्ट करणे, शासकीय नोकरी न दिल्यास २० लाख रुपये देणे या तिन्ही विषयाला शासन स्तरावरील धोरणात्मक बाब असल्याचे लिखित स्वरूपात मिळाले. 

टॅग्स :bhandara-acभंडारा